शहरं
Join us  
Trending Stories
1
१३ चेंडूंत चोपल्या ६४ धावा! 'Virat' पराक्रम करताना चौकार-षटकारांचा पाऊस, थोडक्यात हुकले शतक
2
Air India च्या कर्मचाऱ्यांचा संप मागे; हकालपट्टी झालेल्या 25 कर्मचाऱ्यांना कामावर परत घेणार...
3
विराट कोहलीला शतकाची हुलकावणी, पण RCB ची आतषबाजी; PBKS समोर २४२ धावांचे लक्ष्य
4
मतदान झालं, बारामतीत लीड कोणाला?; सुनेत्रा पवारांच्या विजयाबद्दल अजित पवार म्हणाले...
5
यशाची गॅरंटी; 'पुष्य नक्षत्र' असेल PM मोदींसाठी खास, 'या' दिवशी उमेदवारी अर्ज भरणार...
6
शिवसेना नेते सुरेशदादा जैन यांचा उद्धवसेनेच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा
7
"खलिस्तानवर नियंत्रण ठेवण्याची गरज", ब्रिटनच्या NSA सोबत अजित डोवालांची चर्चा
8
ही निवडणूक राहुल गांधी vs नरेंद्र मोदी अन् जिहाद विरुद्ध...; अमित शाह यांचा मोठा हल्ला
9
PBKS vs RCB सामन्यात गारांचा पाऊस! सामना झालाच नाही तर कोण होईल 'गार'? चाहत्यांची वाढलीय चिंता
10
फटाक्यांच्या कारखान्यात भीषण स्फोट, 8 ठार, 3 गंभीर; शिवकाशीत भीषण दुर्घटना
11
"अदानी, अंबानींची चौकशी करा; सत्य बाहेर येईल"; पंतप्रधान मोदींच्या टीकेवर काँग्रेसकडून पलटवार
12
धक्कादायक! चार दिवसांत दोन मातांनी गमावले प्राण, अहेरीत आरोग्यसेवेचा बोजवारा
13
तुफान राडा अन् लाथा-बुक्क्यांची जुगलबंदी! बसच्या दरवाज्यात दोन महिलांमध्ये तुंबळ हाणामारी (Video)
14
अब की बार, मतदान जोरदार!... कोल्हापुरातील वाढलेला टक्का कुणाला देणार धक्का? 
15
महिला डॉक्टरचा पाठलाग अन् सातत्याने मिस कॉल; आरोपीला ठोकल्या बेड्या
16
श्रीलंकेने वर्ल्ड कप स्पर्धेसाठी वनिंदू हसरंगाच्या नेतृत्त्वाखाली तगडा संघ उतरवला; CSK, MI ला दिला धक्का 
17
'12th Fail' फेम विक्रांत मेसीने टॅक्सी ड्रायव्हरला केली शिवीगाळ? अभिनेत्यावर गंभीर आरोप, व्हिडिओ व्हायरल
18
मोठी बातमी : एक चूक काय झाली, LSG च्या मालकांनी लोकेश राहुलच्या हकालपट्टीची तयारी सुरू केली
19
"निवडणूक प्रचार हा मूलभूत अधिकार नाही", केजरीवाल यांच्या जामीन अर्जाला ईडीचा विरोध
20
विराट कोहलीला पंजाबविरूद्धच्या सामन्यात मोठ्या विक्रमाची संधी; ठरू शकतो पहिलाच भारतीय!

बसमध्ये आढळली बॉम्ब सदृश्य वस्तू; रसायनी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Published: February 21, 2019 7:42 PM

रसायनी पोलीस ठाण्यात अज्ञात इसमांविरोधात भा. दं. वि. कलम २८६ सह भारतीय स्फोटक कायदा कलम ४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

ठळक मुद्देकाल रात्री ११. ५  वाजण्याच्या सुमारास रायगडचे पोलीस अधीक्षक अनिल पारस्कर यांच्यासह अलिबागहून बीडीडीएस आणि डॉग स्कॉड पथक घटनास्थळी पोहोचले. शेवटी रात्री साडेतीनच्या सुमारास यशस्वीरीत्या बॉम्ब निकामी केले गेले आणि त्यानंतर सर्वांनी सुटकेचा निश्वास सोडला.

 

पनवेल - पनवेलमधील आपटा बस स्थानकावरील बसमध्ये बॉम्ब सदृश्य वस्तू आढळून आली होती. रात्री कर्जतवरून आपट्याला येणारी बस आपटा बस डेपोमध्ये थांबली असताना कंडक्टरला एका पिशवीत काही तरी टाईम बॉम्बसारखे असल्याचे आढळून आले. याबाबत त्यांनी स्थानिक पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी ताबडतोब बॉम्ब नाशक व शोधक पथकाला कळवले. याबाबत रसायनी पोलीस ठाण्यात अज्ञात इसमांविरोधात भा. दं. वि. कलम २८६ सह भारतीय स्फोटक कायदा कलम ४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

काल रात्री ११. ५  वाजण्याच्या सुमारास रायगडचे पोलीस अधीक्षक अनिल पारस्कर यांच्यासह अलिबागहून बीडीडीएस आणि डॉग स्कॉड पथक घटनास्थळी पोहोचले. तोपर्यंत लोकांना याची माहिती मिळाली असल्याने सर्वांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते. पोलिसांनी सर्वांना बसपासूनच दूर केले होते. आलेल्या बाँब शोधक पथकाने पाहणी केली असता ती वस्तू खरोखरच बॉम्ब असल्याचे आढळून आले. रात्री उशिरापर्यंत बाँब निकामी करण्याचे काम सुरू झाले. शेवटी रात्री साडेतीनच्या सुमारास यशस्वीरीत्या बॉम्ब निकामी केले गेले आणि त्यानंतर सर्वांनी सुटकेचा निश्वास सोडला.

टॅग्स :Bombsस्फोटकेBDDS Teamबीडीडीएसdogकुत्राCrime Newsगुन्हेगारीpanvelपनवेलPoliceपोलिस