बॉम्ब बनवताना झालेल्या स्फोटात बॉम्ब बनविणारेच झाले जखमी
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 9, 2018 19:20 IST2018-10-09T19:19:48+5:302018-10-09T19:20:16+5:30
हा घातक बाॅम्ब बनवण्यामागे त्याचा काय हेतू होता याचा आता गुन्हे शाखेचे पोलीस तपास करत आहेत.

बॉम्ब बनवताना झालेल्या स्फोटात बॉम्ब बनविणारेच झाले जखमी
मुंबई - सुतळी बाॅम्बच्या दारूपासून घातक बाॅम्ब बनवत असताना झालेल्या स्फोटात दोन जण जखमी झाल्याची घटना शनिवारी रात्री घडली. या दुर्घटनेत अरजुल शेख (वय २२) सह एक अल्पवयीन आरोपी जखमी झाला आहे. हा घातक बाॅम्ब बनवण्यामागे त्याचा काय हेतू होता याचा आता गुन्हे शाखेचे पोलीस तपास करत आहेत.
मुंबईच्या अॅन्हाॅप हिल नगर येथील गरीब नवाज रोडवरील नूर बाजारात हे दोघे रहात होते. मूळचे पश्चिम बंगालचे रहिवाशी असलेले हे दोघे मागील काही दिवसांपासून काही संशयास्पद गोष्टी करत होते. शनिवारी रात्री अचानक त्याच्या खोलीत स्फोट झाला. हा स्फोट इतका घातक नव्हता. मात्र, त्याचा आवाज हा एक किलोमीटर अंतरावर ऐकू येईल इतक्या क्षमतेचा स्फोट होता. या स्फोटामुळे आजूबाजूच्या झोपड्यांचे छप्पर ही. हे दोघेही या दुर्घटनेत जखमी झाले. ही बाब पोलिसांच्या कानावार पडल्यानंतर त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिस तपासात हे दोघे सुतळी बाॅम्बच्या दारूपासून खिळे आणि काचांचे तुकडे वापरून घातक बाॅम्ब बनवत असताना ही दुर्घटना घडली. या गुन्ह्यांचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले आहे. या दोघांवर गुन्हा नोंदवून पोलिसांना हा गुन्हा गुन्हे शाखेच्या पोलिसांकडे वर्ग केला आहे. या प्रकरणी पोलिस अधिक तपास करत आहेत.