शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

बॉलिवूडचे ड्रग्ज कनेक्शन पुन्हा चर्चेत; ‘हवाईयन थीम’वर तीन दिवस रंगणार होती रेव्ह पार्टी 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 28, 2021 17:32 IST

Rave Party Busted by Police : सव्वा लाखांचा मद्यसाठा जप्त; न्यायालयाने हिना पांचालसह सर्वांना सुनावली पोलीस कोठडी

ठळक मुद्देसोमवारी (दि.२८) या २२ लोकांना न्यायालयापुढे पोलिसांनी हजर केले असता न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली.ही 'रेव्ह पार्टी' साधीसुधी मुळीच नव्हती. हा सगळा बेत एका 'हवाईयन पार्टी'च्या धर्तीवर आखला गेला होता, असे पोलिसांनी सांगितले.

नाशिक : बॉलिवुडशी संबंधित दोन कोरिओग्राफर अन‌् अभिनेत्रींचा सहभाग असलेल्या २२व्यक्तींच्या समुह इगतपुरीतील दोन आलिशान बंगल्यांमध्ये थेट तीन दिवसांच्या मुक्कामाला आलेला होता. या हायप्रोफाईल नशेबाजांच्या समुहाने ‘हवाइयन’ संकल्पनेवर अधारित तीन दिवसीय रेव्ह पार्टीचा बेत आखला होता, अशी धक्कादायक बाब सोमवारी (दि.२८) समोर आली आहे. अभिनेत्री हिना पांचालसह अन्य ११ महिला आणि सहा पुरुषांना एक दिवसाची तर चौघा पुरुषांना नऊ दिवसांची पोलीस कोठडी दिली आहे.

इगतपुरीचा परिसर मुंबईकरांनाही जवळ आहे. कसारा घाट चढून आल्यानंतर इगतपुरी वाटेत लागते. येथील स्काय ताज व्हीला, स्काय लगून व्हीला या दोन खासगी बंगल्यात संशयित पियूष सेठीयाच्या वाढदिवसाच्या निमित्ताने तब्बल पाच दहा नव्हे तर एकुण १० पुरुष आण १२ महिला असे २२ जण एकत्र येऊन शुक्रवारपासून रेव्ह पार्टीत रंगले होते. ही 'रेव्ह पार्टी' साधीसुधी मुळीच नव्हती. हा सगळा बेत एका 'हवाईयन पार्टी'च्या धर्तीवर आखला गेला होता, असे पोलिसांनी सांगितले. नाशिक ग्रामीण पोलीस दलाच्या अपर पोलीस अधीक्षक शर्मिष्ठा वालावलकर यांना खात्रीशीर गुप्त माहिती मिळाली आणि त्यांनी पोलीस अधीक्षक सचिन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली साध्या पोशाखात पोलिसांचा लवाजमा घेत शनिवारी मध्यरात्री या बंगल्यांवर छापा मारत हायप्रोफाईल पार्टी उधळून लावली. येथून २२ संशयितांना पोलिसांनी अटक करुन अंमली पदार्थ बाळगून त्याचे सेवन केल्याप्रकरणी इगतपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या सर्वांची वैद्यकिय तपासणी करण्यात आली असून रक्ताचे नमुनेही तपासण्यासाठी संकलित करण्यात आले आहेत. सोमवारी (दि.२८) या २२ लोकांना न्यायालयापुढे पोलिसांनी हजर केले असता न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली.

बॉलिवूडचे ड्रग्ज कनेक्शन पुन्हा चर्चेत!या सर्वांनी मिळून एका दिवसात महागड्या ब्रॅन्डची सुमारे सव्वा लाखाची दारु रिचविल्याचे बंगल्यांच्या परिसरात आढळून आलेल्या रिकाम्या बाटल्यांवरुन पोलिसांनी निष्पन्न केले आहे. तसेच तेवढ्याच किंमतीचा सीलबंद मद्यसाठा पोलिसांनी येथून जप्त केला आहे. ड्रग्ज, कोकेन, चरस, गांजा यांसारखे अंमली पदार्थही पोलिसांच्या हाती लागल्याने बॉलिवुडचे ड्रग्ज कनेक्शन पुन्हा एकदा चर्चेत आले आहे.

टॅग्स :Heena Panchalहिना पांचाळNashikनाशिकPoliceपोलिसbollywoodबॉलिवूडArrestअटकCourtन्यायालयDrugsअमली पदार्थ