Bollywood's 'B' grade again busted; Casting director was running Sex racket | धक्कादायक! बॉलिवूडचा कास्टिंग डायरेक्टर चालवत होता सेक्स रॅकेट

धक्कादायक! बॉलिवूडचा कास्टिंग डायरेक्टर चालवत होता सेक्स रॅकेट

ठळक मुद्देअटक कास्टिंग डायरेक्टरचं नाव नवीनकुमार प्रेमलाल आर्या (३२) असं आहे.  या प्रकरणी अजय शर्मा आणि विजय हे दोघे फरार आरोपींच्या मागावर पोलीस आहेत.   स्ट्रगलिंग नवोदित मॉडेल, अभिनेत्रींकडून नवीनकुमार वेश्याव्यवसाय करण्यास भाग पाडतो याची खातरजमा होताच पोलिसांनी सापळा रचला.

मुंबई - गेल्या आठवड्यात गोरेगाव येथील पंचतारांकित हॉटेलाट सुरु असलेल्या सेक्स रॅकेटमध्ये बॉलिवूड अभिनेत्रींना अटक करण्यात आली. ही घटना ताजी असताना आता आणखी एक सेक्स रॅकेटचं प्रकरण उघडकीस आलं आहे. ओशिवारा परिसरात वेश्या व्यवसायासाठी मॉडेल पुरविणाऱ्या बॉलिवूडमधील कास्टिंग डायरेक्टरला मुंबई पोलिसांच्या समाजसेवा शाखेने अटक केली आहे. नवोदित मॉडेल पुरविण्याचे काम हा कास्टिंग डायरेक्टर करत होता. अटक कास्टिंग डायरेक्टरचं नाव नवीनकुमार प्रेमलाल आर्या (३२) असं आहे. 

याप्रकरणी समाजसेवा शाखेनं एका १८ वर्षीय मॉडेलची आणि २५ वर्षीय मेकअप आर्टिस्टची सुखरूप सुटका केली आहे. नुकत्याच प्रदर्शित झालेल्या हिंदी चित्रपटात या मॉडेलने ज्युनिअर आर्टिस्ट म्हणून काम केले आहे. नवीनकुमार हा ओशिवारा परिसरात सेक्स रॅकेट चालवतो, अशी माहिती समाजसेवा शाखेचे प्रभारी पोलीस निरीक्षक संदेश रेवले यांना खबऱ्याकडून मिळाली होती. त्यानुसार, पोलिसांचे पथक नवीनकुमार याच्यावर नजर ठेवून होते.

जुहूतील हॉटेलमधील बॉलिवूडचे कनेक्शन असलेल्या सेक्स रॅकेटवर पोलिसांची धाड 

बॉलिवूडमध्ये करिअर करण्यासाठी आलेल्या स्ट्रगलिंग नवोदित मॉडेल, अभिनेत्रींकडून नवीनकुमार वेश्याव्यवसाय करण्यास भाग पाडतो याची खातरजमा होताच पोलिसांनी सापळा रचला. बनावट ग्राहक बनून पोलिसांनी नवीनकुमारकडे मॉडेलची मागणी केली. त्यानंतर सात बंगला येथील कॅफेमध्ये त्याने या ग्राहकाला भेटण्यास बोलाविले. यावेळी एक मॉडेल आणि एक मेकअप आर्टिस्ट तो सोबत घेऊन आला होता. त्याला एक मुलीच्या बदल्यात ६० हजार रुपये स्विकारताना कास्टिंग डायरेक्टरला पोलिसांनी रंगेहाथ अटक केली आहे. या प्रकरणी अजय शर्मा आणि विजय हे दोघे फरार आरोपींच्या मागावर पोलीस आहेत.  

पंचतारांकित हॉटेलमध्ये ‘सेक्स रॅकेट’चा पदार्फाश, अभिनेत्रींना अटक

Web Title: Bollywood's 'B' grade again busted; Casting director was running Sex racket

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.