शहरं
Join us  
Trending Stories
1
"PM मोदी खूप मोठी चूक करतायेत, जाणूनबुजून..."; इस्त्रायल-इराण तणावावर अबू आझमी संतापले
2
सुधाकर बडगुजरांच्या भाजप प्रवेशाला लागणार मुहूर्त; पदाधिकाऱ्यांचा विरोध मावळला
3
विहीण बाईंवर जीव जडला, बायको वाटू लागली अडचण! पतीने केलेलं कृत्य ऐकून बसेल धक्का 
4
इराण-इस्रायल संघर्षामुळे सोन्याचे दर भडकले! आठवड्यात ३,६४५ रुपयांची वाढ; आजचे दर काय?
5
मैत्रीला धोका? ७३% मित्र पैसेच परत करत नाहीत; तुम्हीही 'या' चुकीला बळी पडलाय का?
6
विजय रुपाणींच्या मृतदेहाची DNA चाचणीनं ओळख पटली; संध्याकाळी कुटुंबाला सोपवणार मृतदेह
7
Mumbai: मुंब्रा दुर्घटनेची माहिती असल्यास रेल्वेला कळवा, प्रशासनाचे नागरिकांना आवाहन!
8
सोमनाथसोबत खरंच लग्न केलं? अखेर राजेश्वरी खरातचा मोठा खुलासा, म्हणाली- "लवकरच मी गुड न्यूज.."
9
'टीम इंडिया'तून वगळलेल्या सरफराज खानचे 'वनडे स्टाईल' शतक, बुमराहला एकही विकेट नाही, ऋतुराजही अपयशी
10
दिवसा काम, रात्री अभ्यास! मोबाईल कव्हर विकणारा रोहित होणार डॉक्टर; NEETमध्ये रचला इतिहास
11
दोन्ही पत्नी अन् आता गर्लफ्रेंडही हिंदू, मग मुलांची नावं मुस्लिमच का? आमिर खान म्हणाला...
12
काव्या मारनसोबतच्या अफेअरच्या चर्चांवर संगीतकार रविचंदरने सोडलं मौन; म्हणाला, "लग्न...?"
13
'फादर्स डे': विराट कोहलीसाठी लेक वामिकाने बनवलं खास ग्रिटींग कार्ड, लिहिलाय खास संदेश
14
परिसरात किती पाणी भरलंय? लगेच कळणार; शहरात रडार लेव्हल ट्रान्समीटर बसवले!
15
"हे गोंधळ पसरवण्यासारखे ..."; एअर इंडियाच्या विमान अपघातावर तुर्कीचे विधान; मेंटनन्स कंपनीवर स्पष्टीकरण दिले
16
इराण-इस्त्रायल युद्धात पाकिस्ताननं घेतली भूमिका; मुस्लीम देशांना एकजूट होण्याचं आवाहन
17
जावेसमोर पतीची चप्पल मांडीखाली लपवली अन् फसली; पतीची हत्या करुन मृतदेहाचे तुकडे लपवले खड्ड्यात
18
बेडरूममधल्या 'या' ३ गोष्टी लगेचच फेका; श्वास घेण्यास त्रास आणि रात्रीची झोपही होईल खराब
19
Mumbai Local: मुंबई लोकलमध्ये आता ज्येष्ठ नागरिकांचा डबा
20
पाक सीमेजवळ विमानांचे उड्डाण धोक्याचे, ४६५ वेळा जीपीएसमध्ये छेडछाडीच्या घटना!

बॉलीवूडवर चौकशीचा ‘अमल’, मोठमोठ्या अभिनेत्री अडकल्या जाळ्यात

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 26, 2020 06:47 IST

ड्रग्ज कनेक्शन : दीपिकासह सारा, श्रद्धा कपूरचीही होणार चौकशी

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : अभिनेता सुशांतसिंह राजपूत मृत्युप्रकरणाच्या तपासादरम्यान समोर आलेल्या ड्रग्ज कनेक्शनप्रकरणी नामांकित अभिनेत्रींची नावे समोर आल्याने अवघे बॉलीवूड हादरले आहे. दीपिका पदुकोण, सारा अली खान आणि श्रद्धा कपूर या तीन आघाडीच्या अभिनेत्रींची शनिवारी एनसीबी चौकशी करणार असल्याने त्याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

अमली पदार्थ नियंत्रक विभागाने (एनसीबी) बुधवारी दीपिका, सारा, श्रद्धा व रकुल प्रीत सिंग यांना समन्स बजावून चौकशीस हजर राहण्यास सांगितले होते. त्यानुसार, शुक्रवारी रकुलची चौकशी झाली.दीपिकाच होती ‘त्या’ ग्रुपची अ‍ॅडमिन;त्याबद्दल एनसीबी करू शकते विचारणाअभिनेत्री दीपिका पदुकोणची मॅनेजर, क्वॉन टॅलेंट मॅनेजमेंट कंपनीची कर्मचारी करिश्मा प्रकाशची एनसीबीने आज सुमारे सात तास चौकशी केली. दीपिका आणि करिश्मा प्रकाश यांच्या व्हायरल झालेल्या २०१७ च्या ड्रग्ज चॅट ग्रुपची दीपिकाच अ‍ॅडमिन असल्याची माहिती समोर आली आहे. त्यानुसार, शनिवारी एनसीबी दीपिकाकडे चौकशी करणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.रणवीरने दीपिकासोबत येऊ देण्याची विनंती केली नाही - एनसीबीघाबरल्यामुळे दीपिकाला पॅनिक अटॅक येऊ शकतो म्हणून दीपिकाच्या चौकशीवेळी तिच्यासोबत राहण्यासाठी पती, अभिनेता रणवीर सिंगने विनंती केल्याचे वृत्त दिवसभर चर्चेत होते. मात्र, रणवीरने कोणतीही लिखित किंवा तोंडी विनंती केलेली नाही, असे एनसीबीने स्पष्ट केले. त्यामुळे चौकशीवेळी रणवीर दीपिकासोबत नसेल, हे स्पष्ट झाले आहे.

अभिनेत्री रकुल म्हणते...रिया माझ्या घरी ड्रग्ज ठेवत असे, मी सेवन केले नाही!एनसीबीने चौकशीसाठी समन्स बजावल्यानंतर शुक्रवारी सकाळी अभिनेत्री रकुल प्रीत सिंगने एनसीबी कार्यालयात हजेरी लावली. एनसीबीने तिची चार तास चौकशी केली. यावेळी व्हायरल झालेल्या व्हॉट्सअ‍ॅप ड्रग्ज संवादाबाबत तिने कबुली दिली. आपण स्वत: कधीच ड्रग्ज घेतले नसून, रियाच माझ्या घरी ड्रग्ज ठेवत असल्याचे सांगितले. त्यामुळे रियाच्या अडचणीत आणखी वाढ होण्याची चिन्हे आहेत.हे तर पार्शियल हँगिंग : सीएफएसएलचा अहवालसुशांतसिंह याचा पूर्णपणे फास लावून नव्हे तर अर्धवट स्थितीतील फास लागल्याने (पार्शियल हँगिंग) मृत्यू झाला आहे, असा निष्कर्ष सेंट्रल फॉरेन्सिक सायंटिफिक लॅबोरेटरी (सीएफएसएल) च्या अहवालात काढण्यात आला आहे.

टॅग्स :Deepika Padukoneदीपिका पादुकोणSara Ali Khanसारा अली खानShraddha Kapoorश्रद्धा कपूरDrugsअमली पदार्थ