Armaan Kohli Arrest: 'बिग बॉस' फेम अभिनेता अरमान कोहलीला अटक; ड्रग्ज कनेक्शनप्रकरणी NCBची कारवाई
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 29, 2021 10:43 IST2021-08-29T08:08:34+5:302021-08-29T10:43:38+5:30
मुंबई : अमली पदार्थ विरोधी नियंत्रण कक्षाने (एनसीबी) बॉलीवूडमधील ड्रग्ज कनेक्शनवर पुन्हा एकदा लक्ष केंद्रित करून कारवाईचा बडगा उगारला ...

Armaan Kohli Arrest: 'बिग बॉस' फेम अभिनेता अरमान कोहलीला अटक; ड्रग्ज कनेक्शनप्रकरणी NCBची कारवाई
मुंबई : अमली पदार्थ विरोधी नियंत्रण कक्षाने (एनसीबी) बॉलीवूडमधील ड्रग्ज कनेक्शनवर पुन्हा एकदा लक्ष केंद्रित करून कारवाईचा बडगा उगारला आहे. शुक्रवारी टीव्ही अभिनेता गौतम दीक्षितला अटक केल्यानंतर शनिवारी बॉलीवूड अभिनेता अरमान कोहलीच्या घरावर छापा टाकून त्याला चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले आहे. रात्री उशिरापर्यंत त्याच्यावर प्रश्नांचा भडिमार सुरू होता.
एनसीबी मुंबईच्या पथकाने शनिवारी सकाळी एका तस्कराला अटक केली. त्याच्याकडून त्याचा बॉलीवूडमधील काही जणांशी संबंध असल्याचे स्पष्ट झाले. त्यानुसार एक पथक पश्चिम उपनगरातील अरमान कोहलीच्या घरी पोहोचले. तेथे छापेमारी करून अनेक वस्तू जप्त केल्या व त्याला ताब्यात घेतले.
टीव्ही कलाकार गौरव दीक्षितला शुक्रवारी अटक करण्यात आली असून त्याला सोमवारपर्यत पोलीस कोठडी मिळाली आहे. काही महिन्यांपूर्वी गौरवच्या घरावर छापा घालून एमडी, ड्रग्स, चरस जप्त केले होते. चित्रपट कलाकार एजाज खान याच्या चौकशीच्या आधारावर त्याला अटक केली असून त्याच्याकडील चौकशीतून अनेक महत्त्वपूर्ण माहिती समोर येण्याची शक्यता आहे. एनसीबीकडून आतापर्यंत ड्रग्स प्रकरणात अनेक अभिनेते आणि अभिनेत्रींची चौकशी करण्यात आली आहे.
बिग बॉस या लोकप्रिय शोमध्येही अरमान कोहली याने भाग घेतला होता. बेकायदा दारुसाठा केल्याप्रकरणी त्याला याआधी अटक करण्यात आली आहे. २०१८ मध्ये अरमान कोहलीवर त्याची लिव्ह इन गर्लफ्रेंड नीरू रंधावा हिला बेदम मारहाण केल्याचा आरोप झाला होता. त्यावेळीही त्याला अटक करण्यात आली होती. एका महिला फॅशन डिझाईनरशी दुर्व्यवहार केल्याप्रकरणीही अरमानवर वर्सोवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे.