सनी लियोनीच्या कारची ‘नंबर प्लेट’ होता वापरत; नृत्यदिग्दर्शकाला वर्सोव्यात अटक
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 27, 2021 06:48 IST2021-02-27T01:39:26+5:302021-02-27T06:48:37+5:30
सेन हा गाड्या खरेदी विक्रीचे कामही करतो. त्याने लिओनीला एक मर्सिडीज गाडी विकली होती.

सनी लियोनीच्या कारची ‘नंबर प्लेट’ होता वापरत; नृत्यदिग्दर्शकाला वर्सोव्यात अटक
मुंबई : बॉलीवूडची बेबीडॉल तसेच पॉर्नस्टार सनी लिओनी हिच्या कारचा हुबेहूब नंबर स्वतःच्या नंबर प्लेटवर लावणाऱ्या पियुष सेन नामक नृत्यदिग्दर्शकाला पोलिसांनी अटक केली आहे. तो कल्याणचा रहिवासी आहे.
सेन हा गाड्या खरेदी विक्रीचे कामही करतो. त्याने लिओनीला एक मर्सिडीज गाडी विकली होती. मात्र त्यानंतर त्याच मॉडेलच्या दुसऱ्या गाडीवर त्याने सनीच्या गाडीचा नंबर असलेली प्लेट लावत ती चालवत होता. त्याने अनेकदा वाहतुकीचे नियम मोडले. परिणामी त्याचे चलान लिओनीला जात होते. हा प्रकार २०२० पासून सुरू होता. जेव्हा लिओनीला आलेल्या एका चलनाच्या लोकेशनला ती गेलीच नसल्याचे तिचा पती डॅनियल वेबरच्या लक्षात आले. तेव्हा त्याच्या मॅनेजरने याची तक्रार जुहू पोलीस तसेच वाहतूक विभागाला केली. लिओनीचा कारचालक अकबर खान याची नजर सेनच्या गाडीवर पडली. तेव्हा प्रकार उघडकीस आला.