पंचतारांकित हॉटेलमध्ये बोगस पोलिसांनी धाड टाकत कोटींचा ऐवज केला लंपास
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 20, 2021 14:27 IST2021-02-20T14:26:55+5:302021-02-20T14:27:36+5:30
Bogus Police Raid on Hotel : वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने दुजोरा दिला असून याप्रकरणी विलेपार्ले पोलीस चौकशी करीत आहेत.

पंचतारांकित हॉटेलमध्ये बोगस पोलिसांनी धाड टाकत कोटींचा ऐवज केला लंपास
मुंबई: विलेपार्ले परिसरात एका पंचतारांकित हॉटेलमध्ये पोलीस असल्याची बतावणी करत प्रवेश करून जवळपास १२ कोटींचा ऐवज लुटून नेल्याची धक्कादायक बाब शनिवारी उघड झाली आहे. याला वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने दुजोरा दिला असून याप्रकरणी विलेपार्ले पोलीस चौकशी करीत आहेत.