रुग्णांच्या जीवाशी खेळणाऱ्या बोगस पिता-पुत्र डॉक्टरांना बेड्या  

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 1, 2019 21:39 IST2019-10-01T21:38:04+5:302019-10-01T21:39:37+5:30

गुन्हा नोंद करून या दोघांना एमएचबी पोलिसांच्या ताब्यात दिले.

Bogus father-and-son doctor arrested by police | रुग्णांच्या जीवाशी खेळणाऱ्या बोगस पिता-पुत्र डॉक्टरांना बेड्या  

रुग्णांच्या जीवाशी खेळणाऱ्या बोगस पिता-पुत्र डॉक्टरांना बेड्या  

ठळक मुद्देरमेश होतीभाई अम्रोथ आणि होतीभाई धर्मसिंग अम्रोथ अशी या दोघांची नावे आहेत. या दोघांकडेही वैद्यक क्षेत्राशी संबंधित पदवी आणि परवाना देखील नव्हता.

मुंबई - वैद्यकीय पदवी नसतानाही सोयरासिस, पॅरालिसिसच्या रुग्णांशी खेळणाऱ्या डॉक्टर पिता-पुत्रांना गुन्हे शाखेच्या कक्ष १२ ने अटक केली. रमेश होतीभाई अम्रोथ आणि होतीभाई धर्मसिंग अम्रोथ अशी या दोघांची नावे आहेत. या दोघांनाही एमएचबी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. या दोघांकडेही वैद्यक क्षेत्राशी संबंधित पदवी आणि परवाना देखील नव्हता. ते दोघे सोयरासिस, पॅरालिसिसच्या रुग्णांकडून उपचाराच्या नावाखाली पैसे उकळत होते. पोलिसांनी त्या क्लिनिकमधून वैद्यकीय साहित्य जप्त केले. या दोघांविरोधात फसवणूक आणि महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलच्या कलमांतर्गत गुन्हा नोंद केला. गुन्हा नोंद करून या दोघांना एमएचबी पोलिसांच्या ताब्यात दिले.

Web Title: Bogus father-and-son doctor arrested by police