१ हजार कोटीच्या अमली पदार्थाच्या तस्करीसाठी बनवले बोगस दस्तऐवज
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 21, 2019 18:50 IST2019-01-21T18:45:11+5:302019-01-21T18:50:26+5:30
बनावट कागदपत्रांच्या आधारे फेंटानिल या प्रतिबंधित रसायनाची तस्करी करण्यात येत होती.

१ हजार कोटीच्या अमली पदार्थाच्या तस्करीसाठी बनवले बोगस दस्तऐवज
मुंबई - १ हजार कोटींच्या अमली पदार्थ तस्करीप्रकरणी आरोपींनी बनावट दस्तऐवज बनवल्याचे उघडकीस आले आहे. त्यामुळे या गुन्ह्यात फसवणूक व बनावट कागदपत्रे बनविल्याप्रकरणी कलमे देखील लावण्यात आली. बनावट कागदपत्रांच्या आधारे फेंटानिल या प्रतिबंधित रसायनाची तस्करी करण्यात येत होती.
अमली पदार्थविरोधी पथकाने १हजार कोटींचे १०० किलो फेंटानिल वाकोला येथून जप्त केले होते. ते मुंबईतून मेक्सिकोला पाठवण्यात येणार होते. अमेरिकेत बंदी असलेल्या आणि हजारो लोकांच्या मृत्यूचे कारण बनलेल्या फेंटानिल अमली पदार्थाची मुंबईतून तस्करी होत असल्याची माहिती अमली पदार्थविरोधी पथकातील अधिकाऱ्याला मिळाली होती. या माहितीची खातरजमा करून अमली पदार्थविरोधी पथक आणि पोलिसांनी छापा टाकून सलीम ढाला, चंद्रमणी तिवारी, संदीप तिवारी, धनंजय सरोज यांना अटक केली होती.
मोठी कारवाई! 1 हजार कोटींचे फेंटानिल ड्रग्ज जप्त; ४ जणांना अटक