The body of the youth was found in the deep freezer in a burnt condition | खळबळजनक! जळालेल्या अवस्थेत डीप फ्रिजरमध्ये आढळला युवकाचा मृतदेह

खळबळजनक! जळालेल्या अवस्थेत डीप फ्रिजरमध्ये आढळला युवकाचा मृतदेह

ठळक मुद्देयाआधी करौलीमध्ये एका पुजाऱ्याला जिवंत जाळल्यानंतर या दुकानदारानं पगार मागितल्यानंतर त्याला दारू कंत्राटदारांनी पेट्रोल टाकून जिवंत जाळल्याचा आरोप करण्यात आला आहे.

राजस्थानच्या अलवर जिल्ह्यातील खैरथल पोलीस ठाण्याच्या हद्दीत एक खळबळजनक घटना घडली आहे. या घटनेत पाच महिन्यांचा न झालेला पगार मागितल्याने युवकाला जिवंत जाळून डीप फ्रिजरमध्ये ठेवण्यात आलं असल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला आहे. सेल्समन असलेल्या कमल किशोर (२२) याचा जागीच मृत्यू झाला. कमल किशोरच्या अंगावर पेट्रोल टाकून त्याला जिवंत जाळण्याची आल्याचा आरोप केला जात आहे.

याआधी करौलीमध्ये एका पुजाऱ्याला जिवंत जाळल्यानंतर या दुकानदारानं पगार मागितल्यानंतर त्याला दारू कंत्राटदारांनी पेट्रोल टाकून जिवंत जाळल्याचा आरोप करण्यात आला आहे. २२ वर्षीय कमल किशोरचा मृतदेह दारूच्या दुकानावर डीप फ्रीजरमध्ये जळलेल्या अवस्थेत आढळला आहे. कमल किशोरच्या कुटुंबियांनी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. दारू दुकानाचे कंत्राटदार सुभाष आणि राकेश यादव हे फरार आहेत.


मृत कमल किशोरचा रूप सिंग यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. त्यांनी सांगितले की, त्याचा भाऊ खेरथल क्षेत्रात असलेल्या समीप कुमपूर गावात सुभाष यादव यांच्या दारूच्या दुकानावर सेल्समन म्हणून काम करत होता. पाच महिन्यांपासून त्याला पगार दिला नव्हता. पगार मागण्यासाठी कमल सुभाष यादव यांच्याकडे गेला आणि अलवर जिल्ह्यातील झाडका येथील आपल्या घरी पार्ट आल. शनिवारी सायंकाळी कंत्राटदार आणि कमलचे काही कामावर काम करणारे त्याच्या घरी आले आणि त्याला सोबत घेऊन गेले. त्यानंतर आरोपींनी दारूच्या दुकानाला आग लागली आणि त्यात कमल किशोर असल्याचे सांगितले गेले. मात्र, रविवारी सकाळी दारूच्या दुकानाचे शटर तोडून आत गेल्यानंतर कलम डीप फ्रिजमध्ये जळालेल्या अवस्थेत आढळला. आरोपींनी पेट्रोल टाकून जिवंत जाळल्याचा आरोप कमल किशोरच्या भावानं केला आहे.


कुटुंबियांनी सांगितले की, कमलच्या अंगावर पेट्रोल टाकून त्याआधी जाळण्यात आले, त्यानंतर त्याचा मृतदेह फ्रिजरमध्ये ठेवण्याता आला. पोलीस या प्रकरणाची चौकशी करत आहेत. सध्या राकेश यादव आणि सुभाष यादव यांच्याविरुद्ध हत्या आणि ऍट्रॉसिटी ऍक्ट अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी मृतदेहाचा पोस्टमॉर्टेम करून कुटुंबीयांकडे मृतदेह अंत्यसंस्कारासाठी दिला. 
 

Web Title: The body of the youth was found in the deep freezer in a burnt condition

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.