The body of a young woman was found in the lodge, the suspected boyfriend was taken into police custody | लॉजमध्ये तरुणीचा आढळला मृतदेह, संशयित प्रियकराला पोलिसांनी घेतले ताब्यात 

लॉजमध्ये तरुणीचा आढळला मृतदेह, संशयित प्रियकराला पोलिसांनी घेतले ताब्यात 

ठळक मुद्देएका हॉटेलच्या रुममध्ये मंगळवारी दुपारी संशयित प्रियकर तन्मय प्रवीण धानवा (२१,रा.मासवन, कोळीपाडा, पालघर) आणि अर्चना सुरेश भोईर (२०,रा. कल्लाले मान, बोईसर) हे युगल मुक्कामी आले होते.

नाशिकमध्ये एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. नाशिमध्ये एका हॉटेलमध्ये ठाण्यातील बोईसर येथे राहणाऱ्या तरुणीचा संशयास्पद मृतदेह आढळला आहे. सीबीएसवरील एका हॉटेलच्या लॉजिंगमधील खोलीत बुधवारी (दि.१३) संध्याकाळी एका २१वर्षीय युवतीचा मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली. यावेळी त्या युवतीसोबत मुक्कामी वास्तव्यास असलेल्या संशयित प्रियकराला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. युवतीचा तोंड दाबून खुन केल्याचा संशय पोलिसांनी प्रथमदर्शनी वर्तविला आहे.

भयानक! महिलेचे स्तन, जीभ कापून तोंडात आणि गुप्तांगात लाटणे घालून केले अमानुष कृत्य 

याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, शहरातील मध्यवर्ती परिसर असलेल्या सीबीएस सिग्नलजवळील एका हॉटेलच्या रुममध्ये मंगळवारी दुपारी संशयित प्रियकर तन्मय प्रवीण धानवा (२१,रा.मासवन, कोळीपाडा, पालघर) आणि अर्चना सुरेश भोईर (२०,रा. कल्लाले मान, बोईसर) हे युगल मुक्कामी आले होते. बुधवारी दुपारी १२ वाजता हॉटेल व्यवस्थापनाने खोली दरम्यान, बुधवारी संध्याकाळी पाच वाजता तन्मय व अर्चनाचे आई,वडीलांसह अन्य नातेवाईक हॉटेलमध्ये अचानकपणे येऊन धडकले. यावेळी हॉटेलचे व्यवस्थापक व अन्य कामगारांनी दुसऱ्या मजल्यावरील खोली क्रमांक-२०३च्या दिशेने धाव घेतली.

यावेळी खोलीतील पलंगावर अर्चना मृतावस्थेतआढळून आली व तन्मय येथील एका कोपऱ्यात बसलेला होता. याबाबत व्यवस्थापकाने पोलिसांना माहिती दिली. काही वेळेतच सरकारवाडा पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी अर्चनाला तपासून बघितले असता ती मयत झाल्याची खात्री पटली. यावेळी पोलिसांनी तिच्यासोबत थांबलेल्या तन्मयला चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. दरम्यान, पोलिसांनी प्रथमदर्शनी अर्चनाचा तोंड दाबल्यामुळे मृत्यु झाल्याचा संशय व्यक्त केला आहे. त्यामुळे प्रेयसीच्या खूनाच्या संशयावरुन संशयित प्रियकर तन्मय यास पोलिसांनी अटक केली आहे. मयत अर्चनाच्या आईने दिलेल्या फिर्यादीनुसार सरकारवाडा पोलीस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु होते.

Web Title: The body of a young woman was found in the lodge, the suspected boyfriend was taken into police custody

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.