प्रेयसीचे दुसऱ्या मुलाबरोबर संबंध असल्याने प्रियकराने मारली खाडीत उडी; मृतदेह ७४ तासानंतर मिळाला

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 16, 2021 19:08 IST2021-07-16T19:07:21+5:302021-07-16T19:08:52+5:30

Crime News : तो ठाकुरपाडा परीसरातील सायरा अपार्टमेंन्ट या इमारती मध्ये रहात होता.

The body of 'that' young man who jumped into the creek from the bridge was found 74 hours later | प्रेयसीचे दुसऱ्या मुलाबरोबर संबंध असल्याने प्रियकराने मारली खाडीत उडी; मृतदेह ७४ तासानंतर मिळाला

प्रेयसीचे दुसऱ्या मुलाबरोबर संबंध असल्याने प्रियकराने मारली खाडीत उडी; मृतदेह ७४ तासानंतर मिळाला

ठळक मुद्देतो ज्या मुलीवर प्रेम करत होता. तीचे अन्य एका मुला बरोबर प्रेम संबध असल्याचे कळाल्या नंतर वैफल्यग्रस्त होऊन त्याने खाडीत उडी मारुन आत्महत्या केल्याची माहिती त्याच्या मित्राने दिली.

कुमार बडदे 

मुंब्राः मंगळवारी दुपारी मुंब्रा अग्निशमन दलाच्या जवळ असलेल्या चुहा ब्रिज वरुन खाडीत उडी मारलेल्या अरबाज शेख(२२) या तरुणाचा मृतदेह तब्बल ७४ तासानंतर शुक्रवारी दुपारी मध्य रेल्वेच्या जलद मार्गावरील लोखंडी पुलाजवळ असलेल्या झाडांमध्ये  आढळून आला. तो ठाकुरपाडा परीसरातील सायरा अपार्टमेंन्ट या इमारती मध्ये रहात होता.

तो ज्या मुलीवर प्रेम करत होता. तीचे अन्य एका मुला बरोबर प्रेम संबध असल्याचे कळाल्या नंतर वैफल्यग्रस्त होऊन त्याने खाडीत उडी मारुन आत्महत्या केल्याची माहिती त्याच्या मित्राने दिली. मच्छिमारी करणा-या स्थानिक तरुणाच्या मदतीने अग्निशमन दलाच्या जवानांनी त्याचा मृतदेह खाडीबाहेर काढून पुढील कायदेशीर कार्यवाही साठी पोलिसांच्या ताब्यात दिला असून,पोलिसांनी शवविच्छेदनासाठी मृतदेह कळव्यातील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात पाठवला असल्याची माहिती ठामपाच्या आपत्कालीन विभागाचे प्रमुख अधिकारी संतोष कदम यांनी दिली.

Web Title: The body of 'that' young man who jumped into the creek from the bridge was found 74 hours later