The body of the woman found near the lake at CBD Belapur | सीबीडी बेलापूर येथे तलावाजवळ आढळला महिलेचा मृतदेह 
सीबीडी बेलापूर येथे तलावाजवळ आढळला महिलेचा मृतदेह 

ठळक मुद्दे भाग्यश्री पवार (22) असं मृत महिलेचे नाव घटनास्थळी पोलीसांचे पथक पोचले असून तपास सुरु आहे.याबाबत एनआरआय पोलीस तपास करत आहेत.

नवी मुंबई - सीबीडी बेलापूर येथील पालिका मुख्यालयानजीक तलावाजवळ महिलेचा मृतदेह आढळला. भाग्यश्री पवार (22) असं मृत महिलेचे नाव असून घटनास्थळी पोलीसांचे पथक पोचले असून तपास सुरु आहे. पोलिसांच्या प्राथमिक तपासात मृतदेहाच्या तोंडातून फेस आल्याने विषारी औषध पिऊन आत्महत्या केल्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. याबाबत एनआरआय पोलीस तपास करत आहेत. भाग्यश्री या विवाहित असून कोपरखैरणे येथे राहणाऱ्या असल्याची माहिती मिळत आहे. 

Web Title: The body of the woman found near the lake at CBD Belapur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.