खळबळजनक! जुहू चौपाटीवर आढळला अज्ञात व्यक्तीचा मृतदेह
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 18, 2019 19:52 IST2019-06-18T19:49:54+5:302019-06-18T19:52:43+5:30
अंदाजे २२ ते २५ वयोगटातील पुरुषाचा हा मृतदेह असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

खळबळजनक! जुहू चौपाटीवर आढळला अज्ञात व्यक्तीचा मृतदेह
मुंबई - जुहू चौपाटीवर आज सकाळी ८ वाजताच्या सुमारास एका अज्ञात व्यक्तीचा मृतदेह आढळून आला आहे. या मृतदेहाची अद्याप ओळख पटली नसून मृतदेह पालिकेच्या कूपर रुग्णालयात ठेवण्यात आला. अंदाजे २२ ते २५ वयोगटातील पुरुषाचा हा मृतदेह असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
मिळालेल्या माहितीनुसार सकाळी ८ वाजताच्या सुमारास जुहू चौपाटीवर मॉर्निंग वॉक करणाऱ्या नागरिकांना एक मृतदेह पाण्यात तरंगत असल्याचे निदर्शनास आले. त्यांनी याची माहिती तेथे असलेल्या लाईफगार्डना दिली. लाईफगार्ड यांनी हा मृतदेह पाण्यातून बाहेर काढून पोलिसांच्या ताब्यात दिला. पोलिसांनी मृतदेह पुढील तपासणीसाठी पालिकेच्या कूपर रुग्णालयात पाठवला. रुग्णालय प्रशासनाने त्या व्यक्तीचा मृत्यू झाल्याचे सांगितले. मृत तरुण अंदाजे २२ ते २५ वर्षांचा असून त्याची अद्याप ओळख पटलेली नाही. याबाबत पोलीस अधिक तपास करत आहेत.