खळबळजनक! गोरेगावच्या जंगलात सापडला अज्ञात इसमाचा मृतदेह
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 26, 2020 19:39 IST2020-05-26T19:39:15+5:302020-05-26T19:39:39+5:30
मुंबई - गोरेगाव पूर्व येथे जंगल आरे कॉलनी परिसरातील केलटी पाडा येथे युनिट क्रमांक 13 नजीक 40 ते 42 ...

खळबळजनक! गोरेगावच्या जंगलात सापडला अज्ञात इसमाचा मृतदेह
ठळक मुद्देअज्ञात आरिपीचा तसेच मृत इसमाबाबत सखोल चौकशी करत असून याबाबत 4 जणांना चौकशीसाठी ताब्यात घेतले असून आरे पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक खाडे या गुन्ह्याचा तपास करत आहेत.याप्रकरणी आरे पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला.
मुंबई - गोरेगाव पूर्व येथे जंगल आरे कॉलनी परिसरातील केलटी पाडा येथे युनिट क्रमांक 13 नजीक 40 ते 42 वर्षाच्या पुरुषाचा बेवारस मृतदेह आढळून आला. याप्रकरणी आरे पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला.
काल केलटी पाडा युनिट क्रमांक 13 या जंगलात एका अज्ञात इसमाचा मृतदेह आढळून आला. पोलिसांना या अज्ञात इसमाचा मृत्यू मारहाण केल्याने झाला असल्याने भा. दं. वि. कलम 302 अन्वये गुन्हा नोंद करून अज्ञात आरोपीचा पोलीस शोध घेत आहेत. अज्ञात आरिपीचा तसेच मृत इसमाबाबत सखोल चौकशी करत असून याबाबत 4 जणांना चौकशीसाठी ताब्यात घेतले असून आरे पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक खाडे या गुन्ह्याचा तपास करत आहेत.