धक्कादायक! तरुणीचा मृतदेह पोत्यात सापडला, कुजलेले आंबे आहेत असं सांगून रस्त्याच्या बाजुला फेकले
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 9, 2025 17:40 IST2025-07-09T17:17:19+5:302025-07-09T17:40:15+5:30
Crime News : एका तरुणीचा मृतदेह एका पोत्यामध्ये रस्त्याच्या बाजूला सापडला. या प्रकरणी आता धक्कादायक खुलासा झाला आहे.

धक्कादायक! तरुणीचा मृतदेह पोत्यात सापडला, कुजलेले आंबे आहेत असं सांगून रस्त्याच्या बाजुला फेकले
Crime News : पंजाबमधील लुधियानामधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. फिरोजपूर रोडवर मोटारसायकलवरून आलेल्या दोन तरुणांनी एका मुलीचा मृतदेह पोत्यात भरून फेकल्याचे समोर आले. या दोन तरुणांनी मुलीचा मृतदेह दिवसाढवळ्या आणला होता.
पोलिसांनी दिलेली महिती अशी, दोघेही त्यांच्या दुचाकीवर पोत्यात भरून मृतदेह आणून रस्त्याच्या कडेला फेकून देत होते. ही बाब रस्त्यावरील एका विक्रेत्याने पाहिले. यावेळी त्या व्यापाऱ्याने तरुणांना पोत्यामध्ये काय आहे विचारले. यावेळी तरुणांनी कुजलेले आंबे असल्याचे सांगितले.
Satara Crime: दुसऱ्यांदा प्रेम जडलं, पळून जाण्याचं ठरलं, पण भलतंच घडलं!; तपासात धक्कादायक माहिती
मिळालेल्या माहितीनुसार, लुधियानातील फिरोजपूर रोडवर दोन तरुण मोटारसायकलवरून आले. त्यांनी दुचाकीवर एक पोती भरली होती. त्यांनी आरती चौकात दुचाकी थांबवली आणि तिथे पोती फेकण्यास सुरुवात केली. याचा व्हिडीओ रस्त्यावरील विक्रेत्याने बनवला. या पोत्यामधून खूप वास येत असल्याने त्याला संशय आला. त्याने पोती उघडताच, त्यात एका मुलीचा मृतदेह असल्याचे दिसले. यावेळी त्या विक्रेत्याने आवाज केला. लोक जमली. त्यांनी दोन्ही तरुणांना पकडण्याचा प्रयत्न केला तेव्हा झटापट होऊन ते दोघेही घटनास्थळावरून पळून गेले. तरुणींनी त्यांची बाईक तिथेच टाकून फरार झाले.
लोकांनी आरोपीचा व्हिडिओ बनवला
लोकांनी पोलिसांना माहिती दिली. पोलीस स्टेशन क्रमांक ८ चे पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि तपास सुरू केला. पोलीस मृत मुलीची ओळख पटवण्याचा प्रयत्न करत आहेत. सध्या पोलिसांनी मुलीचा मृतदेह सिव्हिल हॉस्पिटलच्या शवागारात ठेवला आहे. पोलीस व्हिडिओ आणि दुचाकी क्रमांकावरून आरोपीचा शोध घेण्याचा प्रयत्न करत आहेत.
आरोपींचा व्हिडीओ बनवला
पोलिस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी तपास सुरू केला आहे. पोलीस मृत मुलीची ओळख पटवण्याचा प्रयत्न करत आहेत. सध्या पोलिसांनी मुलीचा मृतदेह सिव्हिल हॉस्पिटलच्या शवागारात ठेवला आहे. पोलीस व्हिडीओ आणि दुचाकी क्रमांकावरून आरोपीचा शोध घेत आहेत.
याआधी काही दिवसापूर्वीच लुधियानामध्ये एका व्यक्तिची हत्या करुन निळ्या रंगाच्या ड्रममध्ये ठेवल्याचे समोर आले होते. या प्रकरणात पोलिसांनी मृताची ओळख पटवली असून आरोपीला अटक केली. मनोज उर्फ राजूची हत्या त्याच्या मित्राने त्याच्या कुटुंबातील सदस्यांसह केली. मृतदेह कापडात गुंडाळून दोरीने बांधला होता. मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी आरोपीने निळा ड्रम विकत घेतला होता.