बसस्थानकाच्या बाथरूममध्ये आढळला २३ वर्षीय तरुणीचा मृतदेह
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 21, 2025 20:28 IST2025-03-21T20:14:31+5:302025-03-21T20:28:50+5:30
बसस्थानकातील बाथरूमचा दरवाजा आतून बंद होता.

बसस्थानकाच्या बाथरूममध्ये आढळला २३ वर्षीय तरुणीचा मृतदेह
Nashik Crime: राजदेरवाडी येथील सुवर्णा यशवंते ही २३ वर्षीय तरुणी चांदवड बसस्थानकाच्या बाथरूममध्ये बेशुद्ध अवस्थेत आढळून आली. त्यानंतर खाजगी रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले.
गुरुवारी दुपारी ११ ते १२:३० वाजेच्या सुमारास सुवर्णा यशवंते हिची तब्येत बरी नसल्याने तिला भाऊ राकेश व आई सरूबाई व दीर राहुल यशवंते यांनी चांदवड येथे दवाखान्यात आणले. दीर राहुल यशवंते यांनी तिघांना बसस्थानकात सोडून बँकेत पैसे काढण्यासाठी गेले. तेव्हा भावजयी सुवर्णा ही बाथरूममध्ये गेली होती.
दरम्यान, बसस्थानकातील बाथरूमचा दरवाजा आतून बंद होता. यावर दार न उघडल्याने भाऊ राकेशने बसस्थानकातील वाहतूक नियंत्रक यांना बोलावून सदर बाथरूमचे दार तोडले. तेव्हा भावजयी सुवर्णा ही बेशुद्धावस्थेत पडलेली दिसली.