शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

नग्न अवस्थेत सापडला अल्पवयीन मुलीचा मृतदेह; बलात्कारानंतर हत्या केल्याची पोलिसांना संशय

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 24, 2021 21:36 IST

Dead Body Found :प्रथमदर्शनी असे दिसते की, मुलीवर बलात्कार करण्यात आला आणि नंतर तिची हत्या करण्यात आली, असे एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले.

राजस्थानमध्ये अल्पवयीन मुलीचा मृतदेह आढळल्याने खळबळ माजली आहे. एका अल्पवयीनासह दोन जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे, असे बुंदीचे पोलीस अधीक्षक जय यादव यांनी पीटीआयला सांगितले. तिसऱ्या आरोपीचा सहभाग असण्याची शक्यता नाकारता येत नाही, असे ते म्हणाले.१५ वर्षीय आदिवासी मुलगी तिच्या दोन मैत्रिणींसोबत गुरुवारी दुपारी शेळ्या चरण्यासाठी बाहेर गेली होती. संध्याकाळी परत आल्यानंतर दोन्ही मुलींनी पीडितेच्या पालकांना सांगितले की,  १५ वर्षीय मुलगीआराम करण्यासाठी मध्येच थांबली होती. मात्र, बराच वेळ ती न परतल्याने त्या दोघो पुढे निघून गेल्या. त्यानंतर मुलीचे पालक आणि नातेवाईकांनी शोध सुरू केला, त्यावेळी तिचा नग्न मृतदेह सापडला, असे पोलिसांनी सांगितले.प्रथमदर्शनी असे दिसते की, मुलीवर बलात्कार करण्यात आला आणि नंतर तिची हत्या करण्यात आली, असे एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले. दोन आरोपींवर भारतीय दंड संहिता आणि लैंगिक गुन्ह्यांपासून मुलांचे संरक्षण (POCSO) कायद्याच्या कलम 302 (हत्या), 201 (गुन्ह्याचे पुरावे गायब करणे) आणि 376 (बलात्कार) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे, असे अधिकाऱ्याने सांगितले. शवविच्छेदनानंतर मुलीचा मृतदेह तिच्या कुटुंबीयांच्या ताब्यात देण्यात आला आहे, असे त्यांनी सांगितले.

 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसPOCSO Actपॉक्सो कायदाDeathमृत्यूRajasthanराजस्थान