हॉटेलमध्ये आढळले महिला, पुरुषाचे मृतदेह

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 6, 2019 15:14 IST2019-06-06T15:09:05+5:302019-06-06T15:14:12+5:30

खांदेश्वर पोलीस या प्रकरणी अधिक तपास करीत आहेत.

Body of man and women found in hotel | हॉटेलमध्ये आढळले महिला, पुरुषाचे मृतदेह

हॉटेलमध्ये आढळले महिला, पुरुषाचे मृतदेह

ठळक मुद्देवेळ संपल्यानंतरही हे दोघे रूमच्या बाहेर आले नाहीत. खांदेश्वर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन मृतांचा पंचनामा केला. हॉटेलमधील कर्मचाऱ्यांनी खिडकीच्या काचा फोडून आत प्रवेश केला.

पनवेल - सुकापूर भगतवाडी येथील वीर पार्क हॉटेलमध्ये एक महिला व पुरुषाचा मृतदेह आढळला आहे. त्यांची ओळख पटलेली नसून, खांदेश्वर पोलीस या प्रकरणी अधिक तपास करीत आहेत.
वीर पार्क हॉटेलमध्ये ४ जून रोजी एक सुमारे ५० वर्षीय पुरु ष व ३५ वर्षीय महिला रात्री १२ वाजण्याच्या सुमारास आले होते. बुधवारी दुपारी त्यांची चेकआउटची वेळ होती; परंतु वेळ संपल्यानंतरही हे दोघे रूमच्या बाहेर आले नाहीत. त्यामुळे हॉटेलच्या वेटरने रूमचा दरवाजा ठोठावला; परंतु आतून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे हॉटेलमधील कर्मचाऱ्यांनी खिडकीच्या काचा फोडून आत प्रवेश केला. या वेळी महिला व पुरु ष दोघेही मृतावस्थेत आढळून आले. या घटनेची माहिती मिळताच खांदेश्वर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन मृतांचा पंचनामा केला. सदर इसमाने प्रथम महिलेला ठार मारून त्यानंतर गळफास लावून आत्महत्या केल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. दरम्यान, या प्रकरणी मृत्यू पावलेल्यांची ओळख पटविण्याचे काम सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

Web Title: Body of man and women found in hotel