प्रेमप्रकरण न संपवल्याने सख्ख्या भावाने १५ वर्षाच्या बहिणीची गळा दाबून केली हत्या
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 14, 2021 21:59 IST2021-06-14T21:58:31+5:302021-06-14T21:59:14+5:30
Murder Case : आरोपी वेलटिंगचे काम करतो.

प्रेमप्रकरण न संपवल्याने सख्ख्या भावाने १५ वर्षाच्या बहिणीची गळा दाबून केली हत्या
शेजारच्या एका तरुणासोबत १५ वर्षीय बहिणीचे प्रेमप्रकरण सुरू असल्याची माहिती मिळाल्यानंतर भावाने आपल्या बहिणीची गळा दाबून हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. बहिणीची हत्या केल्यानंतर नातेवाईकांनी या घटनेची माहिती पोलिसांना देण्याऐवजी त्यांनी लपवून अंत्यसंस्कार करण्याची तयारी सुरू केली होती. मात्र, या घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी दाखल होऊन मृतदेह ताब्यात घेतला. त्याचबरोबर आरोपी भावालाही अटक देखील केली. या हत्येप्रकरणी पुढील तपास पोलीस करत आहे.
संबंधित घटना उत्तर प्रदेशाच्या बिजनौर शहरातील नगीना परिसरात घडली आहे. येथील एका १५ वर्षीय मुलीचे शेजरच्या तरुणासोबत प्रेमसंबंध सुरू होते. याची माहिती कुटुंबीयांना मिळाल्यानंतर त्यांनी मुलीला ताकीद दिली होती. तर मृत मुलीचा भाऊ तिच्यावर खूपच चिडला होता. मृत मुलीनं आपले प्रेमसंबंध संपवावेत यासाठी भाऊ आणि कुटुंबीयांनी तिच्यावर दबाव आणत होते. मात्र, तिने कोणाचेही म्हणणे ऐकले नाही.
नंतर संतापलेल्या थोरला भाऊ आणि मृत धाकटी बहिणीत दोन दिवसांपूर्वी मोठा वाद झाला. आपल्या बहिणीच्या प्रेमसंबंधामुळे चिडलेल्या भावाने तिला बेदम मारहाण केली. त्यानंतर आरोपी भावाने गळा आवळून तिची निर्घृण हत्या केली. मुलाचा गुन्हा लपवण्यासाठी घरच्यांनी मृत मुलीच्या मृतदेहावर लपून अंत्यसंस्कार करायचे ठरवले. त्यासाठी कबरस्तानात कबर खोदण्यासही सुरुवात केली. मात्र, या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन मृतदेह ताब्यात घेतला आहे. तसेच आरोपी भावालाही अटक केली आहे. आरोपी दिल्लीत वेलटिंगचे काम करतो.