ऑफलाइनपेक्षा ऑनलाइन प्रेमाला अधिक बहर; तुम्ही नेमके कुणाच्या प्रेमात आहात?

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 13, 2025 10:14 IST2025-02-13T10:13:39+5:302025-02-13T10:14:08+5:30

गेल्यावर्षी ११ महिन्यात सायबर फसवणुकीचे ३१७१ गुन्ह्यांची नोंद झाली आहे. यापैकी ६१३ गुन्ह्यांची उकल  झाली आहे.

Blindly trusting someone without knowing them, loving them, and occasionally engaging in physical intimacy have become common. | ऑफलाइनपेक्षा ऑनलाइन प्रेमाला अधिक बहर; तुम्ही नेमके कुणाच्या प्रेमात आहात?

ऑफलाइनपेक्षा ऑनलाइन प्रेमाला अधिक बहर; तुम्ही नेमके कुणाच्या प्रेमात आहात?

मनीषा म्हात्रे

मुंबई : चार भिंतींच्या आड दडलेले प्रेम काळानुरूप बदलत गेले. आता ऑफलाइनपेक्षा ऑनलाइन प्रेमाला अधिक बहर आला आहे. अवघ्या काही दिवसांच्या मैत्रीतून प्रेम आणि अनैतिक संबंधांचा फास तरुणाईभोवती आवळला जात आहे. त्यातून बलात्कार, फसवणूक, ब्लॅकमेलिंग यांसारखे गैरप्रकार फोफावले आहेत.

मित्र-मैत्रिणींचे पाहून आपल्यालाही गर्ल व बॉयफ्रेंड असावा, असा हट्ट तरुणाई धरू लागली आहे. त्यातूनच समोरच्या व्यक्तीची माहिती न घेता त्याच्यावर आंधळा विश्वास ठेवून प्रेम करणे, प्रसंगी शारीरिक जवळीक साधणे असे प्रकार सर्रास होऊ लागले आहेत. त्यामुळेच तुम्ही नेमके कोणाशी डेटिंग करत आहात, हे या व्हॅलेंटाइन डेच्या निमित्ताने सोशल मीडियावरील प्रेमी युगुलांनी जाणून घेणे गरजेचे बनले आहे. नामांकित रुग्णालयात डॉक्टर म्हणून काम करणाऱ्या तरुणीची काही महिन्यांपूर्वी ‘फेसबुक’वर इटलीच्या स्पायरो रॉड्रिक्स जॉन (३५) याच्याशी ओळख झाली. ओळखीचे रूपांतर मैत्रीत झाले आणि मैत्रीचे प्रेमात. 

काही दिवसांपूर्वी जॉनने तिला एक गिफ्ट पाठविले असल्याचे सांगितले. त्यानंतर अचानक तरुणीला एक फोन आला. फोनवरील व्यक्तीने कस्टम अधिकारी बोलत असल्याचे सांगत, जॉनचे गिफ्ट हे महागडे असून, कस्टम ड्युटी भरल्यानंतरच ते मिळेल, असे त्या तरुणीला सांगितले. कस्टम अधिकाऱ्यांनी सांगितलेल्या खात्यावर पैसे पाठविले. मात्र, त्यांच्या मागण्या संपत नव्हत्या. 

त्यामुळे तिला संशय आला. दिल्लीला जाऊन तिने कस्टम अधिकाऱ्यांकडे चौकशी केली आणि यात फसवणूक झाल्याचे लक्षात आले. अशाच प्रकारे अनेक जण सायबर भामट्यांच्या जाळ्यात अडकत आहे. गेल्यावर्षी ११ महिन्यात सायबर फसवणुकीचे ३१७१ गुन्ह्यांची नोंद झाली आहे. यापैकी ६१३ गुन्ह्यांची उकल 
झाली आहे.

सोशल मीडिया वापरताय ? अशी घ्या काळजी ...
सर्व सोशल मीडिया अकाउंट्सची सेटिंग्ज प्रायव्हेट ठेवा. समाजमाध्यमांवर अनोळखी व्यक्तीची फ्रेंड रिक्वेस्ट स्वीकारू नका. त्यातही अनोळखी, सुंदर आणि तरुण मुलींचा फोटो असलेल्या अकाउंटपासून विशेष सावध राहा. त्यांच्याशी पर्सनल चॅट बॉक्समध्ये चॅटिंग करू नका.  पैशांचे व्यवहार टाळा. आपल्याला बदनामीची भीती घालून कोणी ब्लॅकमेल करत असेल तर, तत्काळ पोलिसांकडे तक्रार करा, असे आवाहन सायबर पोलिसांकडून करण्यात येत आहे.

स्क्रीन टू स्क्रीनवर भर 

तरुण पिढी ‘फेस टू फेस’ कमी बोलतात, मात्र, ‘’स्क्रीन टू स्क्रीन’ संपर्क करणे जास्त सोपे आणि सोयीचे समजतात. समोरच्या व्यक्तीबाबत कोणत्याही प्रकारची माहिती नसताना, इतरांप्रमाणे आपलेही सोशल मीडियावरचे फॉलोअर्स, फ्रेंड जास्त असण्यासाठी धडपड सुरू असते. समोरची व्यक्ती स्त्री आहे की पुरुष हे सांगणे कठीण असताना, आपली व्यक्तिगत माहिती, फोटो अशा माध्यमांवर पाठवू नये. स्वतःचे पासवर्ड, खासगी माहिती शेअर करू नये. जेणेकरून, ऑनलाइन ओळखीतून अत्याचार, ब्लॅकमेलिंग, फसवणूक, लूट अशा सायबर गुन्ह्यांना आपण बळी पडू शकतो.

Web Title: Blindly trusting someone without knowing them, loving them, and occasionally engaging in physical intimacy have become common.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.