भाजपा कार्यकर्त्यांनी पोलिसांवर केला हल्ला, एकजण जखमी
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 11, 2021 17:01 IST2021-01-11T17:00:32+5:302021-01-11T17:01:09+5:30
Attack On Police In Powai : पवई पोलीस ठाण्यात कार्यरत पोलीस कर्मचारी नितीन खैरमोडे हे जखमी झाले.

भाजपा कार्यकर्त्यांनी पोलिसांवर केला हल्ला, एकजण जखमी
ठळक मुद्देमुख्य आरोपी दिपू तिवारी व आयुष राजभर यांचा शोध सुरू असून तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे असून हे सर्व भाजपचे कार्यकर्ते असल्याची माहिती आहे.
मुंबई - पवई परिसरात मोटर सायकलवरून भरधाव वेगाने ट्रिपल सीट जात एका वृद्धेला धडक देण्यात आली. या तिघांना हटकणाऱ्या पवई पोलीस ठाण्याच्या दोन कर्मचाऱ्यांवर हल्ला चढविण्यात आला. ज्यात पवई पोलीस ठाण्यात कार्यरत पोलीस कर्मचारी नितीन खैरमोडे हे जखमी झाले.
याप्रकरणी सचिन तिवारी नामक इसमाला ताब्यात घेण्यात आले आहे. तर मुख्य आरोपी दिपू तिवारी व आयुष राजभर यांचा शोध सुरू असून तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे असून हे सर्व भाजपचे कार्यकर्ते असल्याची माहिती आहे.
पवई पोलीस ठाण्याच्या कर्मचाऱ्यावर हल्ला, भाजपच्या कार्यकर्त्यावर गुन्हा दाखल pic.twitter.com/KI9XBfR3sS
— Lokmat (@MiLOKMAT) January 11, 2021