भाजपा नेत्याचा खळबळजनक आरोप, पत्नीनेच दिली माझ्या हत्येची सुपारी
By पूनम अपराज | Updated: November 18, 2020 13:48 IST2020-11-18T13:47:51+5:302020-11-18T13:48:20+5:30
Crime News : तक्रारीत त्यांनी म्हटले आहे की, पत्नी सिंह यांनी संपत्ती हडप केल्याबद्दल त्याला ठार मारण्याची सुपारी दिली होती.

भाजपा नेत्याचा खळबळजनक आरोप, पत्नीनेच दिली माझ्या हत्येची सुपारी
उत्तर प्रदेशच्या बलियामध्ये भाजपा नेते अनुप सिंह यांनी आपल्याच पत्नीवर हत्येचा कट रचल्याचा आरोप केला आहे. याप्रकरणी पोलिसांनी दोन कथित सुपारी किलर यांना अटक केली आहे. याप्रकरणी भारतीय जनता पक्षाच्या किसान मोर्चाचे राष्ट्रीय प्रवक्ते ठाकूर अनूप सिंह यांनी पोलिसांकडे एफआयआर दाखल केला आहे. तक्रारीत त्यांनी म्हटले आहे की, पत्नी सिंह यांनी संपत्ती हडप केल्याबद्दल त्याला ठार मारण्याची सुपारी दिली होती.
याप्रकरणी पोलिसांनी विकास लोहार आणि छोटे सिंह या दोन जणांना अटक केली आहे. त्यांच्यावर खुनाची व दरोड्याच्या अनेक गुन्हे दाखल आहेत. याप्रकरणी पोलिसांनी तपास सुरू केला आहे. अनूप सिंग यांनी आरोप केला आहे की, कौटुंबिक न्यायालयात बलियामध्ये आपल्या पत्नीबरोबरच्या कौटुंबिक वादाचा खटला सुरु आहे. अनूप सिंह म्हणाले की, माझी संपत्ती हडप करण्यासाठी पत्नीने सुपारी दिली आहे. सुपारी घेणाऱ्यांमध्ये अनूप सिंगने छोटे सिंह आणि विकास लोहार यांची नावे घेतली आहेत.
त्यांच्या पत्नीने सुपारी किलरला भरमसाठ रक्कम दिली असल्याचे भाजप नेते अनुप सिंह यांनी म्हटले आहे. अनूप सिंगचा असा दावा आहे की, आपल्याकडे याची ऑडिओ क्लिप आहे आणि आवश्यकतेनुसार ते पुरावा म्हणून सादर करू शकतात. अनूप सिंह म्हणतात की, काही दिवसांपूर्वी काही लोक त्याच्या घरी आले आणि त्यांनी जिवे मारण्याची धमकी दिली. अनूप सिंग यांनी याप्रकरणी पोलिसांकडून त्वरित कारवाई करण्याची मागणी केली आहे.