शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
4
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
5
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
6
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
7
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
8
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
9
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
10
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
11
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
12
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
13
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
14
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
15
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
16
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
17
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
18
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
19
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
20
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
Daily Top 2Weekly Top 5

पर्यावरणाच्या ह्रासप्रकरणी भाजपा नेते नरेंद्र मेहतांच्या भावावर गुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 25, 2021 17:49 IST

मीरारोडच्या कनकीया परिसरातील ७११ क्लब इमारतीच्या मागील मौजे नवघर सर्व्हे क्रं. ५१, ६८, ६९ पैकी जमिनीवर २००५ च्या एमआरसॅक  नकाशा नुसार कांदळवन ची झाडे होती

ठळक मुद्देमहापालिका आयुक्त दिलीप ढोले यांच्या मंजुरी नंतर प्रभाग अधिकारी कांचन गायकवाड यांनी फिर्याद देऊन मीरारोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला.

मीरारोड - भाजप नेते तथा माजी आमदार नरेंद्र मेहता यांचे भाऊ विनोद मेहता यांच्यावर ७११ क्लब इमारतीमागील कांदळवनचा ऱ्हास केल्याप्रकरणी महापालिकेने मीरारोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. विनोद मेहता हे माजी महापौर डिंपल मेहता यांचे पती आहेत. 

मीरारोडच्या कनकीया परिसरातील ७११ क्लब इमारतीच्या मागील मौजे नवघर सर्व्हे क्रं. ५१, ६८, ६९ पैकी जमिनीवर २००५ च्या एमआरसॅक  नकाशा नुसार कांदळवन ची झाडे होती. सदर ठिकाणी ७११ हॉटेल्स प्रा ली ने  असलेली कांदळवनची झाडे नष्ट करून भराव केला व लॉन तयार केले. तसेच कुंपण भिंती, पाथवे , रस्ता आदी कामे केली. कांदळवन नष्ट करून पर्यावरणाचा ऱ्हास केल्या प्रकरणी गेल्यावर्षी पालिकेने स्थळपाहणी करून अहवाल तयार केला होता. 

महापालिका आयुक्त दिलीप ढोले यांच्या मंजुरी नंतर प्रभाग अधिकारी कांचन गायकवाड यांनी फिर्याद देऊन मीरारोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला. ७११ हॉटेल्स प्रा ली चे संस्थापक आणि सर्वात मोठे भागधारक माजी आमदार नरेंद्र मेहता आहेत. तर सातबारा नोंदी संचालक म्हणून त्यांचा भाऊ विनोद मेहता आहे. 

गुन्ह्यातील सर्वे क्रमांक हे ७११ क्लबच्या आवारातील असून सातत्याने कांदळवन नष्ट करून पर्यावरणाचा ऱ्हासकेल्या प्रकरणी या आधी देखील विनोद मेहता, प्रशांत केळुस्कर, रजनीकांत सिंह आदींवर गुन्हे दाखल आहेत. आता आणखी एक गुन्हा दाखल झाल्याने माजी आमदार नरेंद्र मेहता यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. गुन्ह्याचा पुढील तपास हा मीरारोड पोलीस ठाण्याचे पोलिस निरीक्षक शैलेंद्र नगरकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक विजय चव्हाण व त्यांचे पथक करत आहेत. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीBJPभाजपाPoliceपोलिसenvironmentपर्यावरण