भाजप नगरसेविकेला मारहाण, घंटागाडी लावण्यावरून वाद
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 22, 2020 17:35 IST2020-10-22T17:35:01+5:302020-10-22T17:35:42+5:30
Crime News : कामगारनगरातील प्रकार

भाजप नगरसेविकेला मारहाण, घंटागाडी लावण्यावरून वाद
यवतमाळ : घनकचरा गोळा करण्यासाठी आलेली घंटागाडी घरापुढे का उभी ठेवली, यावरून वाद घालत एकाने चक्क भाजप नगरसेविकेला मारहाण केली. ही घटना गुरुवारी दुपारी २ वाजता घडली.
प्रभाग क्र.६ मध्ये येत असलेल्या कामगारनगर परिसरात नगरपालिकेची घंटागाडी कचरा संकलनाचे काम करत होती. परिसरातील रस्ते अरूंद असल्याने घंटागाडी एका जागेवर उभी ठेवून कचरा संकलित केला जातो. यावरून आरोपी किसन नक्षणे (५५) रा.कामगारनगर याने नगरसेविका साधना विनोद काळे यांना शिवीगाळ करत मारहाण केली. या घटनेनंतर नगरसेविका काळे यांनी शहर पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली. याप्रकरणी पोलिसांनी कलम ३५२, ३५४, ३२३, २९४, ५०६ भादंविनुसार आरोपीविरूद्ध गुन्हा दाखल केला आहे. याचा अधिक तपास ठाणेदार धनंजय सायरे करीत आहे.