दिवाळीनिमित्त पैसे मागायला गेलेल्या तृतीयपंथीयांना नागरिकांनी दिला चोप 

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 27, 2018 20:40 IST2018-10-27T20:27:30+5:302018-10-27T20:40:24+5:30

मालाड येथील मालवणी परिसरातील तीन तृतीयपंथी भाईंदर येथे दिवाळीनिमित्त पैसे मागण्यासाठी गेले होते. दुपारच्या सुमारास येथील भाईंदर येथील बालाजी नगर परिसरात तृतीयपंथी जमले होते.

Bitten transgender who went to ask for money on Diwali | दिवाळीनिमित्त पैसे मागायला गेलेल्या तृतीयपंथीयांना नागरिकांनी दिला चोप 

दिवाळीनिमित्त पैसे मागायला गेलेल्या तृतीयपंथीयांना नागरिकांनी दिला चोप 

मुंबई - दिवाळी सणानिमित्त पैसे मागायला गेलेल्या तृतीयपंथीयांना भाईंदर येथील स्थानिक रहिवाशांनी जबर मारहाण केल्याची घटना घडली आहे. या घटनेमध्ये एक स्थानिक महिलाही जखमी झाली आहे. जखमी तृतीयपंथी आणि नागरिकांनी भाईंदर पोलिसांकडे एकमेकांविरोधात तक्रार नोंदवली आहे.

मालाड येथील मालवणी परिसरातील तीन तृतीयपंथी भाईंदर येथे दिवाळीनिमित्त पैसे मागण्यासाठी गेले होते. दुपारच्या सुमारास येथील भाईंदर येथील बालाजी नगर परिसरात तृतीयपंथी जमले होते. या परिसरातील दुकानदाराकडून दिवाळीनिमित्त पैसे गोळा करत होते. यावेळी एका दुकानातील महिलेशी पैशावरुन त्यांचा वाद झाला. या महिलेनी ११ रुपये या तृतीयपंथीला दिले. मात्र, त्यांनी अधिक रक्कमेची मागणी केली. यामुळे झालेल्या वादातून तृतीयपंथीयांची येथील स्थानिकांबरोबर बाचाबाची झाली. स्थानिकांच्या जमावाने तीन तृतीयपंथींना चोपले. त्यावेळी तृतीयपथींनी घटनास्थळावरून पळ काढला.  

Web Title: Bitten transgender who went to ask for money on Diwali