शहरं
Join us  
Trending Stories
1
Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंना मुंबई पोलिसांचे समन्स; १० नोव्हेंबरला तपास अधिकाऱ्यांसमोर हजर राहण्याचे निर्देश!
2
स्टाँग रूमचे CCTV बंद, मध्यरात्री एका पिकअप व्हॅनची एन्ट्री; RJD च्या आरोपानंतर तपासाचे आदेश
3
चीनने वाढवली लष्करी ताकद! तिसरी विमानवाहू युद्धनौका 'फुजियान' तयार, अमेरिकेची चिंता वाढली
4
कोण आहेत गजाला हाशमी? ज्यांनी अमेरिकेत रचला नवा इतिहास; भारताशी थेट कनेक्शन, जाणून घ्या
5
ब्रिस्बेनच्या मैदानात पावसाची बॅटिंग! टीम इंडियानं ऑस्ट्रेलियाविरुद्धची टी-२० मालिका २-१ अशी जिंकली
6
बिहारमध्ये वाढलेल्या मतदानाचा अर्थ काय, कोणता फॅक्टरमुळे वाढलं मतदान? प्रशांत किशोरांनी मांडलं गणित
7
'...तर आम्ही शिंदेंच्या शिवसेनेसोबतची दोन जिल्ह्यात युती तोडू'; नारायण राणेंचा इशारा, तेलींबद्दल काय बोलले?
8
डॉक्टरच्या लॉकरमध्ये मिळाली AK-47 रायफल, जम्मू-काश्मीर पोलीसही चकित; नेमकं प्रकरण काय?
9
"भैया मत करो...", बाईकवर मागे बसलेल्या तरुणीसोबत रॅपिडो चालकाचं धक्कादायक कृत्य
10
Mumbai: कूपर रुग्णालयात मृत रुग्णाच्या नातेवाईकाकडून डॉक्टरांना मारहाण
11
"आधी कर्जबाजारी व्हायचं आणि मग पुन्हा कर्जमाफी मागायची"; राधाकृष्ण विखे पाटलांची शेतकऱ्यांवर आगपाखड
12
"पंतप्रधान मोदींनीही घातली होती टोपी, मी फोटो पाठवेन", मुस्लीम तुष्टीकरणाच्या आरोपांवर काय म्हणाले रेवंत रेड्डी?
13
लय मोठा विषय चाललाय! चीन, पाकिस्तान अन् बांगलादेशला एकाचवेळी झटका; भारतीय सैन्य काय करतंय?
14
Rishabh Pant: टीम इंडियाचं टेन्शन वाढलं, ऋषभ पंत पुन्हा जखमी, अर्ध्यातच मैदान सोडलं!
15
बिहार निवडणुकीनंतर भाजपाला मिळणार नवा राष्ट्रीय अध्यक्ष? बड्या नेत्याने दिले सूचक संकेत
16
पार्थ अजित पवार जमीन प्रकरणात शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “समाजासमोर वास्तव...”
17
स्टंटबाजी करणाऱ्या टवाळखोरामुळं युवती जीवाला मुकली; ११० च्या स्पीडनं उडवलं, दात तुटले अन्...
18
उपाशी ठेवलं, बेदम मारलं... पोटच्या लेकाने, सुनेने जमिनीसाठी केले जन्मदात्या आईचे हालहाल
19
"वहिनी, तुमची जोडी जमत नाही, हे काका कोण?", रील्सचं वेड, सर्वस्व असलेल्या नवऱ्याच संपवलं
20
Viral Video: मिरची पूड घेऊन ज्वेलर्समध्ये शिरली, पण प्लॅन फसला! दुकानदारानं २० वेळा थोबाडलं

मुंबईत बिसलरीचे सीईओ व दोन अधिकाऱ्यांवर लोखंडी रॉड आणि पाईपने हल्ला

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 8, 2024 23:51 IST

याप्रकरणी अंधेरी पोलिसांनी अज्ञात व्यक्तींविरुद्ध एफआयआर नोंदवला आहे.

मुंबई : बिसलेरी कंपनीचे सीईओ आणि दोन अधिकाऱ्यांवर अज्ञातांकडून हल्ला झाल्याची घटना घडली आहे. कंपनीचे सीईओ, एचआर हेड आणि मार्केटिंग हेड हे गुरुवारी अंधेरी (पूर्व) येथील एका हॉटेलमध्ये जेवण करून कामावर परतत असताना चार अज्ञात व्यक्तींनी लोखंडी रॉड आणि पाईपने त्यांच्यावर हल्ला केला. याप्रकरणी अंधेरी पोलिसांनी अज्ञात व्यक्तींविरुद्ध एफआयआर नोंदवला आहे.

दरम्यान, हल्लेखोर युनियनचे असू शकतात आणि काही अंतर्गत बाबींमुळे ही घटना घडली असावी, असा संशय व्यक्त करण्यात येत आहे. याप्रकरणी अंधेरी पोलिसांनी अद्याप कोणालाही अटक केलेली नाही. तसेच, हल्लेखोरांची ओळख पटवण्यासाठी आणि त्यांना शोधण्यासाठी पोलिसांकडून परिसरातील क्लोज सर्किट टेलिव्हिजन (सीसीटीव्ही) द्वारे स्कॅन करण्यात येत आहे.

एचआर हेड समीर गायकवाड यांनी तक्रारीत म्हटले आहे की, "ऑफिसच्या बैठकीनंतर मी कंपनीचे सीईओ अँजेलो जॉर्ज आणि मार्केटिंग हेड तुषार मल्होत्रा यांच्यासोबत जवळच्या रेस्टॉरंटमध्ये जेवणासाठी निघालो. दुपारी 2.50 वाजता आम्ही ऑफिसला परतत असताना चार जण आमच्या जवळ आले. त्यांनी तोंडाला मास्क लावला होता. आम्हाला काही कळायच्या आधीच त्यांनी आमच्यावर लोखंडी रॉड आणि पाईपने मारहाण करण्यास सुरुवात केली. मी जखमी अवस्थेत जमिनीवर पडल्याने माझ्या दोन सहकाऱ्यांनी हल्लेखोरांना थांबवण्याचा प्रयत्न केला पण त्यांनाही हाणामारीत दुखापत झाली."

याचबरोबर, एफआयआरमध्ये समीर गायकवाड यांनी सांगितले की, मदतीसाठी आरडाओरडा केला. त्यावेळी घटनास्थळी गर्दी जमू लागल्याने हल्लेखोरांनी तेथून पळ काढला. दरम्यान, समीर गायकवाड यांनी रुग्णालयात उपचार घेतल्यानंतर पोलिसांशी संपर्क साधून चारही आरोपींबद्दल माहिती दिली. तसेच, पोलीस या हल्ल्यामागील हेतू शोधण्यासाठी गायकवाड आणि कार्यालयातील इतरांकडून माहिती गोळा करत आहेत. या हल्ल्यामागे वैयक्तिक किंवा व्यावसायिक कारण आहे का, याचा तपास सुरू आहे, असे अंधेरी पोलिस ठाण्याच्या एका पोलिस अधिकाऱ्याने सांगितले.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी