संतापजनक! प्रेम प्रकरणातून १७ वर्षीय मुलाचं गुप्तांग छाटलं अन् ठार केलं; आरोपीच्या घरासमोरच अंत्यसंस्कार

By ऑनलाइन लोकमत | Published: July 26, 2021 05:34 AM2021-07-26T05:34:50+5:302021-07-26T05:36:39+5:30

अल्पवयीन मुलावर आरोपीच्या घरासमोर अंत्यसंस्कार प्रेमविवाह नव्हता मान्य

Bihar teen killed, private part chopped; funeral performed outside house of accused | संतापजनक! प्रेम प्रकरणातून १७ वर्षीय मुलाचं गुप्तांग छाटलं अन् ठार केलं; आरोपीच्या घरासमोरच अंत्यसंस्कार

संतापजनक! प्रेम प्रकरणातून १७ वर्षीय मुलाचं गुप्तांग छाटलं अन् ठार केलं; आरोपीच्या घरासमोरच अंत्यसंस्कार

Next
ठळक मुद्देसौरभ कुमार शुक्रवारी रात्री प्रेयसीला भेटण्यासाठी सोनबरसा गावातील तिच्या घरी गेला होता. गंभीर जखमी अवस्थेत आरोपींनी त्याला  खासगी इस्पिळात दाखल केलं. ही घटना कळल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी रवाना होऊन सौरभचा मृतदेह विच्छेदनासाठी पाठविला.

मुझ्झफरपूर (बिहार) :  प्रेमप्रकरणातून प्रेयसीच्या कुटुंबीयांनी बेदम मारहाण करून सतरा वर्षांच्या मुलाला ठार मारले. एवढ्यावरच न थांबता  त्याचे गुप्तांग छाटले. अमानूषपणाचा कळस गाठणारी ही निर्दयी घटना बिहारच्या मुझ्झफरपूर जिल्ह्यातील  रेपुरा रामपूरशाह येथे शुक्रवारी घडली. सौरभच्या मृत्यूने संतापलेल्या त्याच्या नातेवाईकांनी आरोपींच्या घरासमोरच सौरभच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार केले.

सौरभ कुमार शुक्रवारी रात्री प्रेयसीला भेटण्यासाठी सोनबरसा गावातील तिच्या घरी गेला होता. त्याचे हे धाडस पाहून मुलीच्या कुटुंबीयांनी सौरभला बेदम मारहाण केली. गंभीर जखमी अवस्थेत आरोपींनी त्याला  खासगी इस्पिळात दाखल केलं. तसेच त्याच्या कुटुंबीयांना या घटनेची माहिती देऊन आरोपी पसार झाले. शुक्रवारी रात्रीच उपचारादरम्यान सौरभचा मृत्यू झाला, असे पोलिसांनी सांगितले. 

ही घटना कळल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी रवाना होऊन सौरभचा मृतदेह विच्छेदनासाठी पाठविला. शवविच्छेदनानंतर त्याचे पार्थिव गावात पोहोचताच संतप्त जमावाने  त्या मुलीच्या घराबाहेर चिता रचून सौरभच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार केले. सौरभच्या मृत्यूने संतापलेल्या जमावाने आरोपींच्या  घरात तोडफोड करण्याचा प्रयत्न केला. तणावजन्य स्थिती पाहून गावात पोलीस तैनात करण्यात आले आहेत, असे पोलीस अधीक्षक राजेश कुमार यांनी सांगितले. या घटनेप्रकरणी एफआयआर दाखल करण्यात आला असून, फरार आरोपींना पकडण्यासाठी ठिकठिकाणी धाडी टाकल्या जात आहेत. सौरभच्या हत्येप्रकरणी पोलिसांनी सुशांत पांडेय ऊर्फ विजय कुमारला अटक केली आहे. दरम्यान,   मुख्य आरोपीच्या घरावर हल्ला केल्याप्रकरणी तिघांना अटक करण्यात आली आहे.

Web Title: Bihar teen killed, private part chopped; funeral performed outside house of accused

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app
टॅग्स :Policeपोलिस