उच्चभ्रू परिसरात सुरू होतं सेक्स रॅकेट, 'त्या' खोलीस पोलीस पोहोचले अन्...

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 5, 2022 12:28 IST2022-06-05T12:28:14+5:302022-06-05T12:28:38+5:30

बिहारच्या समस्तीपूर येथे पोलिसांनी एका मोठ्या सेक्स रॅकेटचा पर्दाफाश केला आहे. पोलिसांनी याप्रकरणी चार महिला आणि दोन पुरुषांना ताब्यात घेतलं आहे.

bihar police busted sex racket in samastipur two people detained | उच्चभ्रू परिसरात सुरू होतं सेक्स रॅकेट, 'त्या' खोलीस पोलीस पोहोचले अन्...

उच्चभ्रू परिसरात सुरू होतं सेक्स रॅकेट, 'त्या' खोलीस पोलीस पोहोचले अन्...

समस्तीपूर-

बिहारच्या समस्तीपूर येथे पोलिसांनी एका मोठ्या सेक्स रॅकेटचा पर्दाफाश केला आहे. पोलिसांनी याप्रकरणी चार महिला आणि दोन पुरुषांना ताब्यात घेतलं आहे. संबंधित रॅकेट चालवणाऱ्या मुख्य संचालकाला देखील ताब्यात घेण्यात आलं असून त्याची कसून चौकशी सुरू आहे. 

समस्तीपूरच्या गुदरी बाजारमधील हे प्रकरण आहे. पोलिसांना मिळालेल्या तक्रारीनुसार एका ठिकाणी सेक्स रॅकेट सुरू होतं. पोलिसांनी जेव्हा छापा टाकला तेव्हा संबंधित ठिकाणी मोठ्या प्रमाणात नागरिकांनी गर्दी केली. 

शहराच्या गुदरी बाजार परिसरात गेल्या अनेक दिवसांपासून सेक्स रॅकेट सुरू होतं. त्यामुळे जवळपासचे रहिवासी हैराण झाले होते. शनिवारी पोलिसांना याबाबतची माहिती मिळाली आणि त्यांनी छापा टाकला. यात पोलिसांनी चार महिला व दोन पुरुषांना ताब्यात घेतलं आहे. या ठिकाणी गेल्या काही महिन्यांपासून रणजीत सिंह नावाचा व्यक्ती सेक्स रॅकेट चालवत असल्याची माहिती समोर आली आहे. 

समस्तीपूरमधील गुदरी बाजार परिसर उच्चभ्रू परिसर म्हणून ओळखला जातो. पोलीस ठाण्याचे एसएचओ अरुण कुमार राय आरोपींची चौकशी करत आहेत. पोलिसांच्या कारवाईमुळे या परिसरातील नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे. 

Web Title: bihar police busted sex racket in samastipur two people detained