Bihar Crime news: नोकरीवरुन काढल्याचा राग, ड्रायव्हरचा मालकाच्या 5 वर्षीय मुलीवर बलात्कार
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 18, 2022 10:50 IST2022-02-18T10:48:47+5:302022-02-18T10:50:06+5:30
Bihar News: या प्रकरणी न्यायालयाने नराधमाला जन्मठेपेची शिक्षा सुनावली असू, दहा हजारांचा दंडही ठोठावला आहे.

Bihar Crime news: नोकरीवरुन काढल्याचा राग, ड्रायव्हरचा मालकाच्या 5 वर्षीय मुलीवर बलात्कार
पाटणा: बिहारच्या पाटणा येथील मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी पाटणा न्यायालयाने आरोपीला जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. न्यायालयाने आरोपीला 10 हजारांचा दंडही ठोठावला आहे. याशिवाय, न्यायालयाने पाटणाचे जिल्हा दंडाधिकारी आणि पाटणा जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या सचिवांना बिहार सरकारकडून पीडितेच्या कुटुंबाला 6 लाख रुपयांची भरपाई मिळावी, असे आदेश दिले आहेत. या प्रकरणातील आरोपी अजय पांडे पाटणा जिल्ह्यातील मानेर पोलीस स्टेशन हद्दीतील सादिकपूर श्रीनगर येथील रहिवासी आहे.
नेमकं काय घडलं?
मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना पाटलीपुत्र पोलीस ठाण्याच्या हद्दीशी संबंधित आहे. पाटलीपुत्र पोलीस ठाण्यात 17 मे 2018 रोजी बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणात अजय पांडे हा आरोपी आहे. त्याच्यावर प्राध्यापकाच्या मुलीवर बलात्कार केल्याचा आरोप आहे.
कामावरुन काढल्याचा राग
पाटणा न्यायालयाचे विशेष पीपी सुरेश चंद्र प्रसाद यांनी दिलेल्या माहितीनुसार, अजय पांडे हा पीडितेच्या वडिलांच्या गाडीचा चालक होता. पीडितेचे वडील व्यवसायाने प्राध्यापक आहेत. त्यांनी काही कारणास्तव आरोपीला कामावरून काढून टाकले होते. याचाच राग मनात धरुन आरोपीने प्राध्यपकाच्या पाच वर्षीय मुलीवर बलात्कार केला.