१८ वर्षांची तरुणी पडली ५५ वर्षीय व्यक्तीच्या प्रेमात, पुढं घडलं भयंकर, ऐकून पायाखालची जमीन सरकेल

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 29, 2025 17:03 IST2025-04-29T17:03:02+5:302025-04-29T17:03:02+5:30

Man Kills Pregnant Girlfriend: बिहारमध्ये एका ५५ वर्षीय व्यक्तीने १८ वर्षाच्या मुलाला प्रेमाच्या जाळ्यात ओढून तिच्यासोबत शारिरीक संबंध प्रस्थापित केले. यातून तरुणी गर्भवती राहिल्यानंतर आरोपीने तिची गळा आवळून हत्या केली.

Bihar Man arrested for killing pregnant Girl | १८ वर्षांची तरुणी पडली ५५ वर्षीय व्यक्तीच्या प्रेमात, पुढं घडलं भयंकर, ऐकून पायाखालची जमीन सरकेल

१८ वर्षांची तरुणी पडली ५५ वर्षीय व्यक्तीच्या प्रेमात, पुढं घडलं भयंकर, ऐकून पायाखालची जमीन सरकेल

बिहारच्या अररिया जिल्ह्यात एका १८ वर्षाच्या तरुणीची गळा आवळून हत्या करण्यात आली. याप्रकरणी पोलिसांनी मृत तरुणीच्या प्रियकराला बेड्या ठोकल्या आहेत. आरोपीने तरुणीला प्रेमाच्या जाळ्यात अडकून तिच्यासोबत शारीरिक संबंध प्रस्थापित केले. शारिरीक संबंधातून गर्भवती राहिल्यानंतर तरुणीने आरोपीकडे लग्नासाठी तगदा लावला. वैगातून आरोपीने तरुणीला जवळच्या शेतात बोलावून घेतले आणि गळा आवळून तिची हत्या केली. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करीत आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, बिहारच्या बांसबाडी गावात सोमवारी एका तरुणीचा मृतदेह आढळून आल्याने परिसरात खळबळ माजली. पोलीस तपासात तरुणीची गळा आवळून हत्या करण्यात आल्याची निष्पन्न झाले. याप्रकरणी पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करून पुढील तपासाला सुरुवात केली. तपासादरम्यान, पोलिसांनी संशयित आरोपी अब्दुल अहद पिता जैनुल याला ताब्यात घेऊन विचारपूस केली. सुरुवातीला अब्दुलने उडवाउडवीचे उत्तरे दिली. मात्र, पोलिसांनी खाक्या दाखवताच त्याने हत्येची कबूली दिली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत तरुणीचे ५५ वर्षीय आरोपीसोबत गेल्या पाच महिन्यापासून प्रेमसंबंध होती. शारिरीक संबंधातून गर्भवती राहिल्यानंतर तरुणीने आरोपीकडे लग्नासाठी हट्ट धरला आणि पैशांची मागणी केली. पैसे न दिल्यास ती गर्भवती असल्याची बातमी गावकऱ्यांना सांगण्याची धमकी दिली. याला वैतागून आरोपीने तरुणीला जवळच्या शेतात बोलावून घेतले आणि गळा आवळून तिची हत्या केली. याप्रकरणी आरोपीला अटक करण्यात आली असून पोलिसांनी पुढील तपासाला सुरुवात केली.

Web Title: Bihar Man arrested for killing pregnant Girl

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.