मेहुणीला बाइकवर बसवून स्टंट करणं भावोजीला पडलं महागात, रस्त्यावरील महिलेला चिरडलं
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 26, 2021 16:53 IST2021-10-26T16:50:33+5:302021-10-26T16:53:10+5:30
स्टंट दरम्यान बाइकचा वेग इतका जास्त होता की, ज्यामुळे रस्ता क्रॉस असलेल्या महिलेला बाइकने टक्कर दिली. त्यानंतर तिला उपचारासाठी लगेच हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं.

मेहुणीला बाइकवर बसवून स्टंट करणं भावोजीला पडलं महागात, रस्त्यावरील महिलेला चिरडलं
(प्रातिनिधिक छायाचित्र)
अपघाताची एक फारच धक्कादायक घटना बिहारमधून आली आहे. इथे एका व्यक्तीच्या स्टंटबाजीमुळे एका महिलेला आपला जीव गमवावा लागला आहे. मेहुणीला बाइकवर बसवून भावोजी स्टंट करत होता. त्यावेळी रस्त्यावरून जात असलेल्या एका महिलेच्या अंगावर बाइक गेल्याने महिलेचा मृत्यू झाला. ही घटना गोपालगंजची असून एक तरूण त्याच्या मेहुणीला बाइकवर बसवून स्टंट करत होता.
स्टंट दरम्यान बाइकचा वेग इतका जास्त होता की, ज्यामुळे रस्ता क्रॉस असलेल्या महिलेला बाइकने टक्कर दिली. त्यानंतर तिला उपचारासाठी लगेच हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं. पण उपचारादरम्यान तिने जीव गमावला. या अपघातात महिला गंभीर जखमी झाली होती.
४५ वर्षीय मृत महिलेचा नाव इंद्रावती आहे. अपघातानंतर स्थानिक लोकांनी लगेच तरूणाला पकडलं. त्याला विचारपूस केली तर त्याने नेमकं काय घडलं हे सविस्तरपणे लोकांना सांगितलं.
पीडित महिलेच्या नातेवाईकांनुसार, आरोपी तरूणाने सांगितलं की, तो त्याच्या भावाच्या मेहुणीला बाइकवर बसवून आजीच्या गावाजवळ जात होता. अशात वेगाने जात असलेल्या बाइकने धान कापण्यासाठी जात असलेल्या महिलेला मागून जोरदार टक्कर दिली.
टक्कर मारल्यानंतर गंभीरपणे जखमी इंद्रावती देवीला हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं. पण तिची स्थिती फारच नाजूक असल्याने तिला गोपालगंज सदर हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं. पण रस्त्यात तिचा मृत्यू झाला. दुसरीकडे स्थानिकांनी आरोपी तरूणाला पकडून पोलिसांकडे सोपवलं. तरूणालाही गंभीर जखमा झाल्या आहेत.