मुलाने वडिलाना अनेकदा तरूणींसोबत रंगेहाथ पकडलं आणि मग केलं असं काही...

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 8, 2022 12:12 IST2022-07-08T12:12:07+5:302022-07-08T12:12:27+5:30

Bihar Crime News : पोलिसांनी सांगितलं की, मृत व्यक्तीने अनेक तरूणींसोबत अनैतिक संबंध होते, याच कारणाने मुलाने वडील गुड्डू सिंहवर गोळी झाडून हत्या केली.

Bihar father illicit relations many girls son shot dead sleeping | मुलाने वडिलाना अनेकदा तरूणींसोबत रंगेहाथ पकडलं आणि मग केलं असं काही...

मुलाने वडिलाना अनेकदा तरूणींसोबत रंगेहाथ पकडलं आणि मग केलं असं काही...

Bihar Crime News : बिहारच्या पटणामधील रूपसपूरमध्ये माजी जिल्हा परिषद सदस्य राकेश शर्मा उर्फ गुड्डू सिंहची हत्या करण्यात आली होती. याप्रकरणी पोलिसांनी धक्कादायक खुलासा केला आहे. पोलिसांनी सांगितलं की, राकेश शर्माच्या हत्येचा आरोपी राकेशचा मुलगा आहे. पोलिसांनी सांगितलं की, मृत व्यक्तीने अनेक तरूणींसोबत अनैतिक संबंध होते, याच कारणाने मुलाने वडील गुड्डू सिंहवर गोळी झाडून हत्या केली.

असं सांगितलं जात आहे की, गुड्डू सिंह याचे अनेक तरूणींसोबत अनैतिक संबंध होते. यामुळे पूर्ण परिवार वैतागलेला होता. अनेकदा तर मृतकाच्या मुलाने वडिलाला रंगेहाथही पकडलं होतं. यावरून अनेकदा समजावूनही सांगण्यात आलं. मुलाला गुड्डू सिंह धारदार शस्त्र दाखवून जीवे मारण्याची धमकीही देत होता. याला वैतागून गुड्डू सिंहच्या मुलाने मित्र अभिनवसोबत यावरून चर्चा केली. त्याने त्याला गुड्डू सिंहला संपंवण्याचा सल्ला दिला. यानंतर आरोपी मुलाने घरातून 60 हजार रूपयांची चोरी केली. त्यातून त्याने एक पिस्तुल खरेदी केलं. त्याच पिस्तुलीने त्याने वडील गुड्डू सिंहची हत्या केली.

ज्या पिस्तुलीने गुड्डू सिंहची हत्या करण्यात आली त्याला सायलेन्सर लावलं होतं. जेव्हा गुड्डू झोपून होता, तेव्हा त्याच्यावर गोळी झाडण्यात आली. सायलेन्सरमुळे आवाजही आला नाही. पटणाचे एसएसपी मनजीत सिंह यांनी सांगितलं की, आरोपींनी साकेत सदनच्या सीसीटीव्हीचा डीवीआर गायब केला होता. यानंतर हत्या केली. आरोपी मुलाने हत्येनंतर पिस्तुल खिडकीतून कचऱ्यात फेकली होती. आरोपीने वडिलांची सोन्याची घड्याळ आणि सोन्याची चेन बाथरूममध्ये लपवली होती. जेणेकरून कुणीतरी चोरी करण्यासाठी आलं होतं असं वाटावं. मात्र, पोलिसांनी चौकशी केल्यावर जे समोर आलं ते बघून पोलिसही हैराण झाले.

Web Title: Bihar father illicit relations many girls son shot dead sleeping