धक्कादायक! पत्नीने पतीची जीभ तोडून खाल्ली; रक्तही प्यायली, ऐकून पोलिसही चक्रावले...
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 24, 2025 15:57 IST2025-07-24T15:56:19+5:302025-07-24T15:57:13+5:30
Bihar Crime: या घटनेनंतर आरोपी पत्नी फरार असून, पोलिस शोध घेत आहेत.

file photo
Bihar Crime:बिहारच्या गया येथून एका विचित्र आणि अंगावर काटा आणणारी बातमी समोर आली आहे. येथील एका महिलेने भांडणानंतर चक्क पतीची जीभ कापून खाल्ली. याहूनही धक्कादायक बाब म्हणजे, पती रक्ताच्या थारोळ्यात पडला असता, त्याला मदत करण्याऐवजी त्याचे रक्त पिऊन पळ काढला. या घटनेनंतर स्थानिकांनी जखमी पतीला घाईघाईत रुग्णालयात दाखल केले.
पीडित पतीचे नाव मुकेश दास(३६) आहे. जीभ कापल्यामुळे त्याला आता काहीही बोलता येत नाही. मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना सोमवारी सायंकाळी घडली. मुकेशच्या पत्नीने त्याला गोड बोलून जवळ बोलावले आणि जीभ दाखवण्यास सांगितले. सुरुवातीला मुकेशने नकार दिला, पण नंतर पत्नीच्या आग्रहाखातर त्याने जीभ बाहेर काढली. यानंतर पत्नीने आपल्या दाताने मुकेशच्या जीभेचा तुकडा पाडून गिळून टाकली.
आपली नाच्चकी होईल, या भीतीने सुरुवातीला मुकेशने खरी घटना सांगितलीच नाही. पंखा लावत असताना पडलो आणि जीभ कापल्या गेली, असे त्याने सांगितले. मात्र, नंतर त्याच्यावर दबाव टाकला असता, त्याने पत्नीचे कूकृत्य सांगितले. या घटनेपासून आरोपी पत्नी घरातून पळून गेली आहे. पोलिस अजूनही तिचा शोध घेत आहेत.