आत्याला भाचीसोबत संबंध ठेवायचे होते, नकार दिल्याने केली हत्या; मुंगेरमधील धक्कादायक घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 25, 2026 23:09 IST2026-01-25T23:08:15+5:302026-01-25T23:09:39+5:30

Bihar crime news lesbian relation: बिहारच्या मुंगेर जिल्ह्यात आत्यानेच १६ वर्षीय भाचीची हत्या केल्याची धक्कादायक घटना. समलिंगी संबंध ठेवण्यास नकार दिल्याने हे कृत्य घडल्याचा आरोप. वाचा, संपूर्ण प्रकरण आणि पोलिसांची कारवाई.

Bihar crime news lesbian relation: aunt wanted to have sex with niece, killed her for refusing; Shocking incident in Munger | आत्याला भाचीसोबत संबंध ठेवायचे होते, नकार दिल्याने केली हत्या; मुंगेरमधील धक्कादायक घटना

आत्याला भाचीसोबत संबंध ठेवायचे होते, नकार दिल्याने केली हत्या; मुंगेरमधील धक्कादायक घटना

बिहारच्या मुंगेर जिल्ह्यातून माणुसकीला लाजवणारी एक घटना समोर आली आहे. मुफस्सिल पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कुतलूपूर गावात एका १६ वर्षीय अल्पवयीन मुलीची गळा दाबून हत्या करण्यात आली आहे. धक्कादायक बाब म्हणजे, मृत मुलीच्या आत्यानेच तिची हत्या केल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला असून पोलिसांनी आरोपी आत्याला अटक केली आहे.

आरोपी काजल ही समलिंगी प्रवृत्तीची असून ती गावात मुलांसारखा पेहराव करून राहते. पीडित मुलगी तिच्या नात्यात भाची लागत असे. कुटुंबीयांच्या दाव्यानुसार, काजल गेल्या अनेक दिवसांपासून या अल्पवयीन मुलीवर समलिंगी संबंध ठेवण्यासाठी दबाव टाकत होती. मात्र, मुलीने या गोष्टीला वारंवार विरोध केला. याच रागातून काजलने तिची गळा दाबून हत्या केली आणि घटनास्थळावरून पळ काढला.

पोलिस तपास आणि अटक
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन उत्तरीय तपासणीसाठी पाठवला आहे. मुंगेरचे डीएसपी अभिषेक आनंद यांनी सांगितले की, प्राथमिक तपासात ही हत्या असल्याचे स्पष्ट होत आहे. काजल यापूर्वीही गावातील इतर महिलांना आर्थिक आमिष दाखवून किंवा दबाव टाकून अशा अनैतिक संबंधांसाठी प्रवृत्त करत असल्याचे गावकऱ्यांनी सांगितले. पोलिसांनी रविवारी सायंकाळी आरोपी काजलला बेड्या ठोकल्या आहेत.

पोस्टमॉर्टम रिपोर्टनंतर मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होईल, असे पोलिसांनी म्हटले आहे. या घटनेने संपूर्ण परिसरात संतापाची लाट उसळली असून आरोपीला कठोर शिक्षा देण्याची मागणी होत आहे.

Web Title : मुंगेर: समलैंगिक संबंध से इनकार पर चाची ने भतीजी की हत्या की

Web Summary : बिहार के मुंगेर में एक चाची ने समलैंगिक संबंध बनाने से इनकार करने पर अपनी 16 वर्षीय भतीजी की गला दबाकर हत्या कर दी। आरोपी चाची समलैंगिक प्रवृत्ति की है। पुलिस ने उसे गिरफ्तार कर लिया है, मामले की जांच जारी है।

Web Title : Aunt Allegedly Kills Niece for Refusing Same-Sex Relationship in Munger

Web Summary : In Munger, Bihar, a 16-year-old girl was murdered by her aunt after refusing a same-sex relationship. The aunt, known for her homosexual tendencies and masculine attire, allegedly pressured the girl. Police arrested the accused; an investigation is underway.