तरूणाने 'हीर-रांझा'लाही टाकले मागे, पत्नी दूर गेल्याच्या दु:खात केली आत्महत्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 16, 2021 17:23 IST2021-07-16T17:22:36+5:302021-07-16T17:23:19+5:30

पत्नी माहेरी गेल्यावर तरूण दु:खी होता. त्याला तिचं दूर जाणं सहन झालं नाही आणि काही विचार करत त्याने आत्महत्या केली.

Bihar : Bokaro news man commit suicide after separating from wife | तरूणाने 'हीर-रांझा'लाही टाकले मागे, पत्नी दूर गेल्याच्या दु:खात केली आत्महत्या

तरूणाने 'हीर-रांझा'लाही टाकले मागे, पत्नी दूर गेल्याच्या दु:खात केली आत्महत्या

बिहारच्या बोकारो सेक्टर १२ मधील सतनपूर गावात एका २७ वर्षीय तरूणाने घरातील फॅनला गळफास घेऊन आत्महत्या केली. आस्तिक महादानी असं या तरूणाचं नाव असून पत्नीपासून दूर झाल्याचं दु:खं सहन न झाल्याने त्याने आत्महत्या केली. मृतकाची पत्नी ७ महिन्यांची प्रेग्नेंट आहे. नुकतंच त्याचं लग्न झालं होतं आणि ४ दिवसांआधीच पत्नीला तिच्या घरचे लोक माहेरी घेऊन गेले होते. पत्नी माहेरी गेल्यावर तरूण दु:खी होता. त्याला तिचं दूर जाणं सहन झालं नाही आणि काही विचार करत त्याने आत्महत्या केली.

याप्रकरणी पोलीस अधिकारी उज्ज्वल कुमार साहा म्हणाले की, 'मृतक हा मजुरीचं काम करत होता. नोव्हेंबर २०२० मध्ये त्याचं लग्न झालं होतं. त्याची पत्नी ७ महिन्यांची गर्भवती आहे आणि ४ दिवसांआधीच तिच्या घरचे लोक तिला माहेरी घेऊन गेले. अशात पतीच्या मनात काहीतरी सुरू होतं. काही भीती किंवा मोहासारखे विचार आत्महत्येचं कारण असू शकतात. ही घटना गुरूवारी घडली'.

मिळालेल्या माहितीनुसार, मृतकाची आई घरकाम करते. गुरूवारी सायंकाळी ती कामाहून परतली तर घराचा दरवाजा आतून बंद होता. ज्यानंतर तरूणाच्या आईने पोलिसांना सूचना दिली. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून दरवाजा तोडला तर तरूण फॅनला लटकलेला दिसला. 

पोलीस म्हणाले की,  'कुणावरही संशय नाही. प्राथमिक पाहणीत ही आत्महत्याच वाटते. पोलीस पुढील चौकशी करत आहे. पोस्टमार्टम रिपोर्ट आल्यावर घटनेचा खुलासा होऊ शकतो. मात्र, प्राथमिक पाहणीत पत्नी विरह हीच बाब समोर येत आहे.'.
 

Web Title: Bihar : Bokaro news man commit suicide after separating from wife