तरूणी किंवा महिलांना बघताच Kiss करून पळून जातो हा तरूण, एका घटनेचा व्हिडीओ व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 13, 2023 14:09 IST2023-03-13T14:08:35+5:302023-03-13T14:09:12+5:30

Crime News : जमुईमधील एक सीसीटीव्ही फुटेज समोर आलं आहे ज्यात सदर हॉस्पिटलच्या परिसरात एका महिला मोबाइल फोनवर बोलत होती.

Bihar : A man runs away after kissing women in Jamui Bihar police started investigation | तरूणी किंवा महिलांना बघताच Kiss करून पळून जातो हा तरूण, एका घटनेचा व्हिडीओ व्हायरल

तरूणी किंवा महिलांना बघताच Kiss करून पळून जातो हा तरूण, एका घटनेचा व्हिडीओ व्हायरल

Crime News : तुम्ही सीरिअल किलरबाबत तर खूप काही ऐकलं किंवा वाचलं असेल, पण सध्या बिहारच्या जुमईमध्ये एक सीरिअल किसर चर्चेचा विषय ठरत आहे. हा सीरिअल किसर एक तरूण आहे जो अनोळखी महिला आणि तरूणींना एकट्यात पाहून अचानक जाऊन किस करतो. त्यानंतर पळून जातो.

जमुईमधील एक सीसीटीव्ही फुटेज समोर आलं आहे ज्यात सदर हॉस्पिटलच्या परिसरात एका महिला मोबाइल फोनवर बोलत होती. यादरम्यान तरूण मागून येतो आणि महिलेल जबरदस्ती किस करू लागतो. महिला याचा विरोध करते पण तो तिला जबरदस्ती किस करून तिथून फरारही होतो.

या माथेफिरू तरूणाचं हे कृत्य सीसीटीव्ही कॅमेरात कैद झालं आहे. तरूण महिलेला किस करून तिथून फरार होतो, ज्याचा व्हिडीओ समोर आल्यावर सगळेच हैराण झाले. ज्यांनीही हा व्हिडीओ पाहिला त्यांनी हॉस्पिटलमधील महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न उपस्थित केला. 

इतकंच नाही तर घटनेच्या 24 तासांनंतरही हॉस्पिटल व्यवस्थापन आणि जमुई पोलीस तरूणाविरोधात काहीच कारवाई करू शकलेले नाहीत. ही घटना शुक्रवारची सांगितली जात आहे. सदर हॉस्पिटलच्या परिसरात एक महिला फोनवर बोलत होती. महिला या हॉस्पिटलची कर्मचारी आहे.

यादरम्यान हॉस्पिटलची भींत ओलांडून एक माथेफिरू तरूण आला आणि त्याने महिलेला जबरदस्ती किस केलं. महिलेला याचा चांगलाच धक्का बसला. या घटनेबाबत पीडित महिलेने पोलिसात तक्रार दाखल करून न्यायाची मागणी केली आहे. पण अजूनही पोलीस त्याला अटक करू शकलेले नाहीत. पोलिसांनी सांगितलं की, ते लवकरच आरोपीला अटक करतील.

Web Title: Bihar : A man runs away after kissing women in Jamui Bihar police started investigation