Big terrorist racket crackdown; Punjab police action | मोठं दहशतवाद्यांचे रॅकेट उध्वस्त; पंजाब पोलिसांची कारवाई
मोठं दहशतवाद्यांचे रॅकेट उध्वस्त; पंजाब पोलिसांची कारवाई

ठळक मुद्देपाकिस्तान आणि जर्मनी येथील दहशतवादी संघटनांना पाठबळ देणाऱ्या खलिस्तान झिंदाबाद फोर्सच्या (केझेडएफ) दहशतवाद्यांच्या रॅकेटचे पंजाब पोलिसांनी कंबरडं मोडलं मोस्ट वाँटेड दहशतवादी मोहम्मद कलिमुद्दीन मुजाहिरला आसाम एटीएसने टाटा नगर रेल्वे स्टेशन येथून अटक केली आहे.

पंजाब - अमेरिकेत भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे दमदार स्वागत झालं असून भारतात दहशतवादी घातपात घडविण्यासाठी आलेलं दहशतवादी रॅकेट पंजाबपोलिसांनी उध्वस्त केले आहे. पाकिस्तान आणि जर्मनी येथील दहशतवादी संघटनांना पाठबळ देणाऱ्या खलिस्तान झिंदाबाद फोर्सच्या (केझेडएफ) दहशतवाद्यांच्या रॅकेटचे पंजाब पोलिसांनी कंबरडं मोडलं आहे. या दहशतवाद्यांकडे खूप मोठा शस्त्रसाठा सापडला आहे. 5 एके-47 रायफल, पिस्तूल, सॅटेलाईट फोन आणि हॅन्ड ग्रेनेड्ससह मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा पोलिसांनी जप्त केला आहे. कालच अल कायदा या दहशतवादी संघटनेचा हा मोस्ट वाँटेड दहशतवादी मोहम्मद कलिमुद्दीन मुजाहिरला आसाम एटीएसने टाटा नगर रेल्वे स्टेशन येथून अटक केली आहे.


Web Title: Big terrorist racket crackdown; Punjab police action
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.