मोठी बातमी! शक्ती कपूरचा मुलगा रेव्ह पार्टीत सापडला; सिद्धांत कपूर पोलिसांच्या ताब्यात

By ऑनलाइन लोकमत | Published: June 13, 2022 09:49 AM2022-06-13T09:49:03+5:302022-06-13T09:49:38+5:30

Shraddha kapoor Brother Siddhanth Kapoor Detained: सिद्धांत कपूर हा शक्ती कपूरचा मुलगा आहे. सिद्धांत स्वतःही फिल्म लाइनमध्ये आहे. तो अनेक बॉलिवूड चित्रपटांमध्ये दिसला आहे.

Big news! Actor Shraddha Kapoor's brother and shakti kapoor's son Siddhanth Kapoor detained during police raid at a rave party | मोठी बातमी! शक्ती कपूरचा मुलगा रेव्ह पार्टीत सापडला; सिद्धांत कपूर पोलिसांच्या ताब्यात

मोठी बातमी! शक्ती कपूरचा मुलगा रेव्ह पार्टीत सापडला; सिद्धांत कपूर पोलिसांच्या ताब्यात

Next

स्टार किड आर्यन खानला ड्रग्ज प्रकरणी क्लिन चिट मिळाल्यानंतर बॉलिवूडमधून मोठी बातमी येत आहे. ज्येष्ठ अभिनेता शक्ती कपूरचा मुलगा आणि अभिनेत्री श्रद्धा कपूरचा भाऊ सिद्धांत कपूरला बंगळुरु पोलिसानी रेव्ह पार्टीतून ताब्यात घेतले आहे. 

एएनआयनुसार रेव्ह पार्टीवर पोलिसांनी छापा मारला. यानंतर सिद्धांत कपूरला ताब्यात घेणअयात आले. बंगळुरूच्या एमजी रोडवरील एका हॉटेलमध्ये रेव्ह पार्टी सुरु होती. चाचणीमध्ये सिद्धांत कपूरसह सहा जणांनी ड्रग्जचे सेवन केल्याचे समोर आले आहे. 


सिद्धांत कपूर हा शक्ती कपूरचा मुलगा आहे. सिद्धांत स्वतःही फिल्म लाइनमध्ये आहे. तो अनेक बॉलिवूड चित्रपटांमध्ये दिसला आहे. त्याची कारकीर्द फ्लॉप ठरली आहे. चित्रपटांव्यतिरिक्त, तो वेब सीरिज आणि म्युझिक व्हिडिओमध्येही दिसला आहे. हसीना पारकर या चित्रपटात सिद्धांतने श्रद्धासोबत काम केले होते. सुशांत सिंग राजपूत ड्रग्ज प्रकरणात श्रद्धा कपूर एनसीबीच्या रडारखाली आली होती. या संदर्भात एनसीबीच्या टीमने श्रद्धा कपूरचीही चौकशी केली होती.

Web Title: Big news! Actor Shraddha Kapoor's brother and shakti kapoor's son Siddhanth Kapoor detained during police raid at a rave party

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.