बिग बॅश टी - २० क्रिकेट कप सामन्यावर सट्टा लावणारे अटकेत 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 8, 2019 19:55 IST2019-01-08T19:55:08+5:302019-01-08T19:55:42+5:30

या माहितीची शहानिशा करून आशियन इमारतीत छापा टाकून सट्टेबाज बिपीन शाह उर्फ बिपीन इंद्रप्रस्थ (४८) आणि जितेंद्र जाधव (३८) यांना अटक करण्यात आली. 

Big Bash T - 20 cricket betting arrested by santacruz police | बिग बॅश टी - २० क्रिकेट कप सामन्यावर सट्टा लावणारे अटकेत 

बिग बॅश टी - २० क्रिकेट कप सामन्यावर सट्टा लावणारे अटकेत 

मुंबई - सांताक्रूझ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीराम कोरेगावकर यांना गुप्त बातमीदारामार्फत सांताक्रूझ येथील आशियन इमारतीत क्रिकेट सामन्यावर बेकायदेशीररीत्या सट्टा लावत असल्याची माहिती प्राप्त झाली होती. या माहितीची शहानिशा करून आशियन इमारतीत छापा टाकून सट्टेबाज बिपीन शाह उर्फ बिपीन इंद्रप्रस्थ (४८), नारायणलाल रबरी (२४), देवीलाल जाट (४०) आणि जितेंद्र जाधव (३८) यांना अटक करण्यात आली. 

बिपीन शाह हा बिग बॅश या ऑस्ट्रेलिया टी - २० क्रिकेट कप २०१९ च्या सामन्याचे प्रक्षेपण पाहून सामन्याचे सद्यस्थितीवर मोबाईलवर क्रिकेट बेटिंगबाबत संभाषण करताना आढळून आला. तर जितेंद्र जाधव हा लॅपटॉप ऑपरेट करताना पोलीस छाप्यात दिसून आला. तसेच नारायणलाल रेबारी हा पंटर लोकांचे फोन स्वीकारत होता आणि देवीलाल हा आरोपी मदतनीस म्हणून पोलिसांना आढळून आला. पोलिसांनी बेटिंगकरिता वापरलेला लॅपटॉप, मोबाईल्स, टीव्ही आणि रोख रक्कम २० हजार पाचशे रुपये हस्तगत केले आहेत.

Web Title: Big Bash T - 20 cricket betting arrested by santacruz police