शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

Sonali Phogat : सोनाली फोगाट हत्या प्रकरणातील ड्रग्स कनेक्शनवर मोठी अ‍ॅक्शन, अनेकांवर लटकलीय अटकेची तलवार

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 27, 2022 20:01 IST

पोलीस महासंचालक जसपाल सिंह यांनी दिलेल्या माहितीनुसार, अंमली पदार्थांचा पुरवठा करणाऱ्या ड्रग्स पेडरला (आरोपींना) अटक करण्यात आली आहे. ड्रग्स सापडलेल्या ठिकाणच्या मालकालाही अटक करण्यात आली आहे.

सोशल मीडिया स्टार आणि भाजप नेता सोनाली फोगाटच्या हत्येप्रकरणी पोलिसांनी आपली कारवाई अधिक तीव्र केली आहे. या प्रकरणात ड्रग्ज कनेक्शन आल्याने पोलिसांच्या तपासाला आता नवे वळण मिळाले आहे. यातच, या प्रकरणातील मुख्य आरोपी सुखविंदर सिंग आणि सुधीर सांगवान यांना 10 दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. पोलिसांनी शनिवारी अंजुनामध्ये कर्लिज बीच शैकचा मालक एडविन नून्स आणि एक संशयित ड्रग्स तस्कर दत्तप्रसाद गावकरला अटक केली आहे. यानंतर आतापर्यंत या प्रकरणात एकूण चार जणांना अटक झाली आहे. महत्वाचे म्हणजे, या प्रकरणात आणखीही काही लोकांना अटक होऊ शकते. 

ड्रग्स पेडलरला अटक -पोलीस महासंचालक जसपाल सिंह यांनी दिलेल्या माहितीनुसार, अंमली पदार्थांचा पुरवठा करणाऱ्या ड्रग्स पेडरला (आरोपींना) अटक करण्यात आली आहे. ड्रग्स सापडलेल्या ठिकाणच्या मालकालाही अटक करण्यात आली आहे. अनेक पथके या संपूर्ण प्रकरणाचा तपास करत आहेत. ते म्हणाले, कुटुंबाने केलेले काही आरोप आणि उपस्थित केलेल्या शंकांची पडताळणी करण्यासाठी आम्ही एक चमू हरियाणालाही पाठवणा आहोत. कारण त्या शंकांचा तपासावरही परिणाम होईल. याच बरोबर, तपास अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार गोवा पोलिसांचा तपास योग्य दिशेने सुरू आहे, असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.

एनडीपीएस अधिनियमांतर्गत कारवाई - जसपाल सिंह यांनी सांगितले, की याप्रकरणात आधी सुधीर सांगवान आणि सुखविंदर सिंह यांना अटक करण्यात आली होती. यांनी आपण गावकर कडून मादक पदार्थ घेतल्याचे कबूल केले होते. गावकर आणि एडविनवर एनडीपीएस अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रथमदर्शनी असे दिसून येते, की गावकरने सांगवान याला मादक पदार्थ विकले होते आणि सिंहने पार्टीदरम्यान ते फोगाटला दिले. रेस्टॉरन्ट परिसरात ही घटना घडल्याने एडविनला अटक केली आहे.

सांगवान आणि सिंह यांची अडचण वाढली -फोगाट (42) ला 23 ऑगस्टच्या सकाळी उत्तर गोवा जिल्ह्यातील अंजुना येथील सेंट अँथनी हॉस्पिटलमध्ये मृत अवस्थेतच आणण्यात आले होते. गोव्यातील एका न्यायालयाने शनिवारी सांगवान आणि सिंह यांना 10 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसgoaगोवाSonali Phogatसोनाली फोगाट