भोजनगरच्या शेतकऱ्याची कर्जबाजारीपणाला कंटाळून आत्महत्या
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 26, 2020 17:26 IST2020-12-26T17:25:32+5:302020-12-26T17:26:44+5:30
Suicide : पैनगंगा नदीत उडी मारुन आत्महत्या केली. ही घटना शनिवारी उघडकीस आली.

भोजनगरच्या शेतकऱ्याची कर्जबाजारीपणाला कंटाळून आत्महत्या
बिटरगाव (यवतमाळ) : उमरखेड तालुक्यातील भोजनगर येथील शेतकऱ्याने कर्जबाजारीपणाला कंटाळून पैनगंगा नदीत उडी मारुन आत्महत्या केली. ही घटना शनिवारी उघडकीस आली.
वसंता चंदू राठोड (४५) रा. भोजनगर असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे. त्यांनी दोन एकरात कपाशीची पेरणी केली होती. त्यांना दुबार पेरणी करावी लागली होती. यामुळे डोक्यावर कर्ज झाले. या विवंचनेत २३ डिसेंबरला ते घरातून निघून गेले. शनिवारी सकाळी पैनगंगा नदी पात्रात त्यांचा मृतदेहच आढळला. पोलीस पाटील वंदना राठोड, तलाठी ताई दवणे, कोतवाल वासुदेव जुकोटवार यांच्या उपस्थितीत मच्छीमारांनी मृतदेह बाहेर काढला. कर्जबाजारीपणामुळे वसंता राठोड यांनी आत्महत्या केल्याचे सांगितले जाते. त्यांच्या मागे पाच मुली, दोन मुले व मोठा आप्त परिवार आहे. बिटरगाव पोलिसांनी तूर्तास अकस्मात मृत्यूची नोंद घेतली.