भिवंडीत सोनसाखळी चोरट्यास नागरीकांनी पकडून केली बेदम मारहाण ; व्हिडीओ व्हायरल
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 23, 2021 22:32 IST2021-09-23T22:31:07+5:302021-09-23T22:32:23+5:30
Chain snatcher : चोरट्या विरुद्ध निजामपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

भिवंडीत सोनसाखळी चोरट्यास नागरीकांनी पकडून केली बेदम मारहाण ; व्हिडीओ व्हायरल
भिवंडी - शहरातील निजामपूर पोलीस ठाणे अंतर्गत कोंबड पाडा परिसरात सोनसाखळी चोराला पकडून नागरिकांकडून बेदम मारहाण केल्याची घटना बुधवारी सायंकाळी घडली असून मारहाणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर गुरुवारी मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. या प्रकरणी सोनसाखळी चोरट्यावर निजामपुरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सलमान पठाण ( वय ३० वर्ष ) असे सोनसाखळी चोराचे नाव आहे.
शहरातील कोंबड पाडा परिसरात बुधवारी सायंकाळी एक महिला गणपती मंदिरा शेजाराहून जात असताना दुचाकीवर आलेल्या सोनसाखळी चोरट्याने महिलेच्या गळ्यातील दोन तोळ्याचे मंगळसूत्र खेचून पळ काढून पळून गेला, यावेळी महिलेने केलेल्या आरडाओरडा मुळे स्थानिकांनी चोरट्याचा पाठलाग केला असता चोरटा वंजारपट्टी च्या दिशेने पळून जात असतांना चोरटा दुचाकी वरून पडल्याने नागरीकांच्या तावडीत सापडला. त्यास पकडून झडती घेतली असता त्याच्या जवळ महिलेचे मंगळसूत्र आढळून आल्याने संतप्त नागरीकांनी त्याला पकडून पुन्हा कोंबड पाडा परिसरात आणून या चोरट्याला स्थानिक नागरिकांनी बेदम मारहाण केलीये. या मारहाणीत चोरटा गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर भिवंडी उपजिल्हा रुग्णालयात प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी ठाणे जिल्हा रुग्णालयात रवाना केले आहे . चोरट्या विरुद्ध निजामपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.