In Bhiwandi, a gang of fraudsters with gold jewelery is on the run | भिवंडीत सोन्याचे दागिने गहाण ठेवून फसवणुक करणारी टोळी गजाआड; ७३ लाखांचे अडीच किलो सोने जप्त

भिवंडीत सोन्याचे दागिने गहाण ठेवून फसवणुक करणारी टोळी गजाआड; ७३ लाखांचे अडीच किलो सोने जप्त

- नितिन पंडीत

भिवंडी: फसवणुकीच्या अनेक घटना समोर येत असतांनाच सोने गहाण ठेवण्याचा बघाना करून नागरिकांना लुबाडणाऱ्या टोळीला शांतीनगर पोलिसांनी अटक केली असून या टोळीकडून ७३ लाख ५४ हजार ३२० रुपयांचे २४०६ ग्राम वजनाचे दागिने देखील शांतीनगर पोलिसांनी जप्त केले असून या फसवणूक प्रकरणी महिलेसह तिच्या इतर साथीदारांसह एकूण सात जणांना शांतीनगर पोलिसांनी अटक केली असल्याची माहिती भिवंडीचे पोलीस उपयुक्त योगेश चव्हाण यांनी शांतीनगर पोलीस ठाण्यात आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत मंगळवारी दिली आहे. 

रुबी मुस्तकीम अंसारी असे फसवणूक प्रकरणी अटक केलेल्या आरोपी महिलेचे नाव असून सदर आरोपी महिलेने शबनमबानो मोहमद कल्लन शेख ( वय ४६ वर्षे ) या महिलेकडून अंदाजे साडे सहा तोळे वजनाचे एकूण ९० हजार रुपये रक्कमेचे सोन्याचे दागिने ६ महिन्यात परत देतो असे सांगून ते वेळेत परत न देता स्वत:कडे ठेवुन घेवून शबनमबानो यांच्या सोन्याचे दागिन्यांचा अपहार केला असल्याची तक्रार त्यांनी २९ मार्च २०२१ शांतीनगर पोलीस ठाण्यात केली होती . त्याच बरोबर रुबी अन्सारी या महिलेने इतर महिलांचे देखील दागीने घेऊन व्याज देण्याची फसवी स्कीम सांगत फसवणूक केली होती.

एक तोळे सोन्याच्या बदल्यात १५०० रुपये तर एक लाख रुपयावर १० हजार रुपये मासिक व्याज देण्याची फसवी स्कीम रुबी हिने महिलांना सांगितली होती . रुबी हिच्या स्कीम वर अनेक महिलांनी विश्वास ठेवत आपले दागिने रुबीकडे गहाण ठेवले होते. मात्र आपली फसवणूक झाल्या नंतर शबनमबानो यांनी शांतीनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करत पोलिसांनी या फसवणूक प्रकरणी विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल केला . या गुन्ह्याच्या तपासात आरोपी रुबी हिने आपल्या इतर साथीदारांसह सुमारे २६५ लोकांची फसवणूक केल्याचे तपसात निष्पन्न झाल्याने शांतीनगर पोलिसांनी फसवणूक प्रकरणी आरोपी रुबीसह तिच्या इतर सात साथीदारांना देखील पोलिसांनी अटक केली आहे.

या सर्वांनी महिलांची फसवणुक करून मिळविलेले सोन्याचे दागिने गहाण ठेवले होते व गहाण ठेवून सदर सोन्याचे दागिण्यावर रोख रक्कम स्विकारल्या व वेगवेगळ्या स्किम लोकांना सांगुन त्याची फसवणुक केली असल्याचे तपासात उघड झाल्याने या फसवणूक प्रकरणी रूबी अंसारी हिच्यासह तिचे एकुण सात साथिदार यांना गुन्हयात अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून मन्नपुरम गोल्ड लोन भिवडी येथे ठेवलेले १५२५.५ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने , मुथूट फायनास माजीवाडा येथून ९८.४ वजनाचे सोन्याचे दागीने , अटक आरोपी सोनार याचेकडुन ४९३ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने , व एका अटक आरोपीतांकडून २८९.८ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागीने असे आरोपीतांनी विविध ठिकाणी ठेवलेले एकूण २४०६.७ ग्रम वजनाचे ७३ लाख ५४ हजार ३२० रुपये किंमतीचे सोन्याचे दागिने शांतीनगर पोलिसांनी जप्त केले असल्याची माहिती पोलीस उपयुक्त योगेश चव्हाण,सहाय्यक पोलीस आयुक्त प्रशांत ढोले यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे.

सदरची कामगिरी शांतीनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरिक्षक शितल राउत यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक किरणकुमार कबाडी, गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक नितीन पाटील, सहायक पोलीस निरीक्षक नितिन सयुवंशी, सपोनि मुक्ता फडतरे, पोउपनिरि निलेश जाधव, पोउपनि रविंद्र पाटील व तपास पथकातील अमलदार यांनी केली आहे.

Web Title: In Bhiwandi, a gang of fraudsters with gold jewelery is on the run

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.