भीम आर्मी प्रमुख चंद्रशेखर हैदराबाद पोलिसांच्या ताब्यात

By ऑनलाइन लोकमत | Published: January 27, 2020 10:12 PM2020-01-27T22:12:33+5:302020-01-27T22:16:32+5:30

कोर्टाने आझाद यांना १६ फेब्रुवारीपर्यंत प्रदर्शन न करण्याचे आदेश दिले होते.

Bhim Army chief Chandrasekhar detained by Hyderabad police | भीम आर्मी प्रमुख चंद्रशेखर हैदराबाद पोलिसांच्या ताब्यात

भीम आर्मी प्रमुख चंद्रशेखर हैदराबाद पोलिसांच्या ताब्यात

Next
ठळक मुद्देदर्यागंज भागात बेकायदा आंदोलन करून हिंसाचार केल्याप्रकरणी चंद्रशेखर आझाद यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता.लंगर हाऊस पोलीस ठाण्याच्या हद्दीत CAA-NRC विरोधी आंदोलनात चंद्रशेखर आझाद सहभागी झाले होते.

नवी दिल्ली - अलीकडेच दर्यागंज हिंसाचार प्रकरणात अटक झालेल्या भीम आर्मी प्रमुख चंद्रशेखर आझाद यांना दिल्लीच्या कोर्टाने सशर्त जामीन मंजूर केला होता. त्याचबरोबर कोर्टाने आझाद यांना १६ फेब्रुवारीपर्यंत प्रदर्शन न करण्याचे आदेश दिले होते. तसेच शाहीन बागेत सुरू असलेल्या निषेधार्थ कोर्टानेही सहभाग घेण्यास बंदी घातली होती. असे असूनही लंगर हाऊस पोलीस ठाण्याच्या हद्दीत CAA-NRC विरोधी आंदोलनात चंद्रशेखर आझाद सहभागी झाले होते. त्यामुळे चंद्रशेखर आझाद यांना हैदराबाद पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. 

भीम आर्मीचा प्रमुख चंद्रशेखर यांना जामीन मंजूर

भीम आर्मी प्रमुख चंद्रशेखर आझाद यांना दिल्लीत अटक; आंदोलनाला हिंसक वळण

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या आंदोलनासाठी पोलिसांची परवानगी नाकारण्यात आली होती. तरी देखील भीम आर्मीच्या कार्यकर्त्यांनी रस्त्यांवर उतरून CAA-NRC ला विरोध केला. दरम्यान, चंद्रशेखर आझाद यांना गेल्या वर्षी २० डिसेंबरला दर्यागंज भागात पोलिसांनी ताब्यात घेतले होते. दर्यागंज भागात बेकायदा आंदोलन करून हिंसाचार केल्याप्रकरणी चंद्रशेखर आझाद यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता.

Web Title: Bhim Army chief Chandrasekhar detained by Hyderabad police

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.