भांडुप हत्याकांड : आणखी तीन जणांना भांडुप पोलिसांनी घेतले ताब्यात
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 27, 2018 22:42 IST2018-07-27T22:40:58+5:302018-07-27T22:42:41+5:30
सुशील वर्माची काल केली होती चाकू भोसकून हत्या

भांडुप हत्याकांड : आणखी तीन जणांना भांडुप पोलिसांनी घेतले ताब्यात
मुंबई - भांडुपमध्ये महाविद्यालयीन विद्यार्थ्याची काल दिवसाढवळ्या निर्घृण हत्या करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. सुशील वर्मा असे हत्या करण्यात आलेल्या विद्यार्थ्याचे नाव आहे. सर्वोदय नगर येथील श्रीमती रामकली सन्मान सिंग महाविद्यालयातील हा धक्कादायक प्रकार आहे. तोंडावर रुमाल बांधून आलेल्या काही तरुणांनी सुशील वर्मावर महाविद्यालयाच्या आवारातच धारदार शस्त्रांनी सपासप वार करुन त्याची हत्या केली आहे. दुपारी 12.15 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली आहे. या प्रकरणी पोलिसांनी काल एका अल्पवयीन आरोपीला अटक केली होती. त्यानंतर आज तीन अल्पवयीन आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. यामध्ये मुख्य आरोपीचा समावेश आहे.
मयत सुशील हा मुख्य अल्पवयीन आरोपीच्या प्रेयसीसोबत बोलायचा आणि तिच्याशी एकतर्फी प्रेम करत असल्यामुळे सुशीलचा काटा काढण्याचा कट मुलीच्या प्रियकराने आखला. त्यानुसार आपल्या प्रेयसीसोबत बोलणाऱ्या सुशीलचा काल चाकू भोसकून खून करण्यात आला. मुख्य आरोपीची प्रेयसी ही सुशीलच्याच वर्गात शिकत होती अशी पोलीस सूत्रांनी माहिती दिली आहे.