बोंबला! ७० रूपयांच्या कंडोमच्या नादात व्यक्तीने गमावले ३ लाख रूपये!

By ऑनलाइन लोकमत | Published: February 26, 2021 04:24 PM2021-02-26T16:24:05+5:302021-02-26T16:30:18+5:30

स्कूटीची डिक्की उघडली आणि त्यातील बॅगमध्ये ठेवलेले तीन लाख रूपये काढले. सोबतच चावी डिक्कीच्या लॉकलाच सोडून तो तिथून फरार झाला.

Bhagalpur man missed Rs 3 lakh for Rs 70 condom | बोंबला! ७० रूपयांच्या कंडोमच्या नादात व्यक्तीने गमावले ३ लाख रूपये!

बोंबला! ७० रूपयांच्या कंडोमच्या नादात व्यक्तीने गमावले ३ लाख रूपये!

googlenewsNext

बिहारच्या (Bihar) भागलपूरच्या घंटाघरजवळ एका व्यक्तीने ७० रूपयांचा कंडोम खरेदी करण्याच्या नादात तीन लाखांपेक्षा जास्त रूपये गमावले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, घंटाघरजवळ एका मेडिकल स्टोरसमोर आपल्या स्कूटी उभी करून जेव्हा तो व्यक्ती कंडोम खरेदी करायला गेला तेव्हा चावी गाडीलाच विसरला. यादरम्यान कुणीतरी स्कूटीची डिक्की उघडली आणि त्यातील बॅगमध्ये ठेवलेले तीन लाख रूपये काढले. सोबतच चावी डिक्कीच्या लॉकलाच सोडून तो तिथून फरार झाला.

मेडिकलमधून व्यक्ती परत गाडीजवळ आली तर चावी डिक्कीलाच पाहून हैराण झाला. यादरम्यान जेव्हा त्याने डिक्की उघडून पाहिली तर त्यातून पैसे गायब झाल्याचं दिसलं. पीडित व्यक्तीने लगेच पोलिसांना फोन करून याची माहिती दिली. पोलिसांनी आता तपास सुरू केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ज्या व्यक्तीचे पैसे चोरीला गेले ती व्यक्ती आसाममध्ये एअरफोर्समध्ये आहे. (हे पण वाचा : आधी बेशुद्ध केलं, नंतर बुरका घातला...तरूणाने दिवसाढवळ्या तरूणीचं केलं दुसऱ्यांदा अपहरण....)

डिक्कीतून ३ लाख लंपास

पीडित व्यक्तीने सांगितले की, त्याने  घंटाघर येथील पोस्ट ऑफिसमधून ३ लाख १० हजार रूपये काढले. ते त्याने त्याच्या स्कूटीच्या डिक्कीत ठेवले आणि घराकडे निघाला. रस्त्यात घंटाघरजवळ थांबून त्याने काही वस्तू खरेदी केली. त्या डिक्कीत ठेवल्या. यावेळी डिक्कीत पैसे होते.  थोडं पुढे जाऊन तो आधी चंदन आर्या नंतर महावीर मेडिकल हॉलजवळ थांबला. इथे त्याने ७० रूपयांचे कंडोम घेतले. यादरम्यान स्कूटीची चावी स्टार्टरमध्ये ठेवली होती. जेवढ्या वेळात तो मेडिकलमधून परत आला तोपर्यंत कुणीतरी पैशांवर साफ केले होते. (हे पण वाचा : तोतया प्राध्यापकाने दोघींना फसवून थाटला तिसरीशी संसार; पत्नीशी जबरदस्तीने अनैसर्गिक संबंध)

या घटनेची माहिती मिळताच  पोलीस घटनास्थळी पोहोचले. मेडिकल स्टोरमधील सीसीटीव्ही फुटेजही चेक करण्यात आलं. पण त्यातून काही हाती लागलं नाही. डिक्की उघडलेली दिसली. पण ती कुणी उघडली, काय काढलं हे दिसलं नाही. पोलीस आता इतर ठिकाणचे सीसीटीव्ही फुटेज चेक करणार  आहेत. 
 

Web Title: Bhagalpur man missed Rs 3 lakh for Rs 70 condom

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.