धक्कादायक! आणखी एक 'श्रद्धा'; बिहारमध्ये महिलेची हत्या, मृतदेहाचे केले तुकडे अन्...

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 5, 2022 13:53 IST2022-12-05T13:43:12+5:302022-12-05T13:53:13+5:30

दिल्लीतील श्रद्धा वालकर हत्याकांडाचा तपास अजुनही सुरू आहे. यादरम्यान, बिहारमध्येही अशीच एक घटना समोर आली आहे.

bhagalpur lady killed brutally on road accused chopped off hands and other parts of body | धक्कादायक! आणखी एक 'श्रद्धा'; बिहारमध्ये महिलेची हत्या, मृतदेहाचे केले तुकडे अन्...

धक्कादायक! आणखी एक 'श्रद्धा'; बिहारमध्ये महिलेची हत्या, मृतदेहाचे केले तुकडे अन्...

दिल्लीतील श्रद्धा वालकर हत्याकांडाचा तपास अजुनही सुरू आहे. यादरम्यान,  आता बिहारमध्येही अशीच एक घटना समोर आली आहे. बिहारमधील भागलपूर जिल्ह्यातील पीरपैंती पोणीस ठाण्याच्या हद्दीत घटली. हत्या झालेल्या महिलेचे नाव नीलम देवी अस आहे. या महिलेची हत्या शकील मिया नावाच्या आरोपीने केली, चाकूने वार करत मृतदेहाचे तुकडे केल्याचे समोर आले आहे. या महिलेला रुग्णालयात दाखल केले मात्र तिचा मृत्यू झाला आहे. 

पोलिसांनी दिलेली माहिती अशी, नीलम देवी नावाच्या महिलेची हत्या शकील नावाच्या व्यक्तीने केली, आरोपी शकील महिलेवर काही दिवसापासून पाळत ठेऊन होता. महिला बाजारात गेली होती. तेव्हा त्याने महिलेवर धारदार शस्त्राने सपासप वार केले. यात आरोपीने महिलेच्या शरीराचे तुकडे केले. आरोपी वार करुन फरार झाला. महिलेला तात्काळ रुग्णालयात दाखल केले, पण रविवारी महिलेचा उपचारावेळी मृत्यू झाला. 

या घटनेनंतर महिलेच्या नातेवाईकांनी पोलीस ठाण्यात तक्रार दिली. सोमवारी या घटनेतील आरोपी शकील मियाँ याला अटक करण्यात आली. या प्रकरणात पोलिसांनी हलगर्जीपणा केल्याची तक्रार नातेवाईकांनी केली आहे. 'शकील मियाँ तिच्या घरी यायचा, त्याला आईने विरोध केला आणि वडिलांनीही घरी न येण्याची सूचना केली. आईसोबत वाईट हेतू ठेवून शकील घरात येत होता, असा आरोप मृत महिलेच्या मुलीने केला आहे. 

लॉकअपमधून ४ संशयित आरोपी फरार, पोलीस ठाण्यात उडाली खळबळ

याबाबत पोलिसांजवळ कोमतीही तक्रार दिली नव्हती. नीलमच्या आत्म्याला शांती मिळावी म्हणून दोषीला एका महिन्यात फाशीची शिक्षा द्यावी, असे नातेवाईकांचे म्हणणे आहे. पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.

Web Title: bhagalpur lady killed brutally on road accused chopped off hands and other parts of body