शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

प्रियकरानं प्रेमात दिला दगा; निराश झालेल्या प्रेयसीनं त्याच्याच घरासमोर पेटवून घेतलं अन् संपवले आयुष्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 29, 2021 21:15 IST

Girlfriend set Fire Herself : तरुणीची प्रकृती गंभीर असून तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याप्रकरणी आग्रीपाडा पोलिसांनी तपास सुरू केला आहे.

ठळक मुद्दे२१ वर्षीय तरुणी सांताक्रूझ येथील रहिवासी आहे. जखमी तरुणी तीन वर्षांपूर्वी गुजरातमध्ये वडोदरा येथे एका लग्न समारंभासाठी गेली होती.

प्रियकराचा साखरपुडा झाल्याची धक्कादायक माहिती समजल्यानंतर मुंबईतील एका तरुणी रॉकेल ओतून स्वत: ला पेटवून घेतल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. शेजारच्या लोकांनी तात्काळ आग विझवून पीडितेला कस्तुरबा रुग्णालयात दाखल केलं आहे. या घटनेत पीडित तरुणी गंभीर जखमी झाली असून ९० टक्के भाजल्याने तिचा आज मृत्यू झाला. याप्रकरणी आग्रीपाडा पोलिसांकडे अपमृत्यूची नोंद आहे.

२१ वर्षीय तरुणी सांताक्रूझ येथील रहिवासी आहे. जखमी तरुणी तीन वर्षांपूर्वी गुजरातमध्ये वडोदरा येथे एका लग्न समारंभासाठी गेली होती. दरम्यान तेथे तिची एका तरुणाशी ओळख झाली. यानंतर दोघांच्या ओळखीचं रुपांतर मैत्रीत झालं. दोघांमध्ये बातचीत वाढली. नंतर या एकमेकांत प्रेमसंबंध निर्माण झाले. दोघांनी लग्न करण्याचं देखील ठरवलं होतं. त्यांनी आपल्या पालकांना प्रेमसंबंधाबाबत कल्पना दिली होती. मात्र, संबंधित तरुण तरुणी दुरच्या नात्यानं एकमेकांचे भाऊ बहिण लागतात असं सांगून घरच्यांनी लग्नाला नकार दिला.

यानंतर तरुणाच्या आई-वडिलांनी आपल्या मुलासाठी एक वेगळीच मुलगी शोधली आणि पीडितेला काही न कळवता साखरपुडाही उरकून घेतला. या घटनेची माहिती मिळताच पीडित तरुणीने आपल्या प्रियकराच्या घरी सात रस्ता याठिकाणी जाऊन गोंधळ घातला. आरडाओरडा केल्यानंतर संबंधित तरुणी प्रियकारच्या घरात जाऊन घरातील रॉकेलचं कॅन घेत त्यातील रॉकेल अंगावर ओतून घेत. तरुणीनं स्वत:ला पेटवून घेतलं आहे. आजूबाजूच्या लोकांनी आग विझवली आणि तरुणीला उपचारासाठी कस्तुरबा रुग्णालयात दाखल केलं. मात्र दुर्दैवाने तिचा आज मृत्यू झाला. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीMumbaiमुंबईPoliceपोलिसGujaratगुजरातfireआगDeathमृत्यू